शहरात होतोय अनियमियत व दुषीत पाणीपुरवठा – पाण्याची समस्या निकाली काढण्याची भाजपा नगरसेवकांची मागणी

0
642
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे –  (शहेजाद खान )

 
चांदुर रेल्वे शहरात उन्हाळ्याऐवजी चक्क पावसाळ्यातच पाणीटंचाई असुन काही प्रमाणात होणारा पाणीपुरवठा हा ही दुषीत होत आहे. त्यामुळे ही पाण्याची समस्या तत्काळ निकाली काढण्याची मागणी भाजपाच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी रविंद्र पाटील यांना बुधवार ५ जुलै रोजी दिलेल्या निवेदनातुन केली आहे..
चांदुर रेल्वे शहरात गेल्या १ महिन्यापासुन दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. तो ही पुरवठा ४-५ दिवसांआड होत आहे. यामुळे पाण्यासाठी शहरवासीयांना वणवण फिरण्याची वेळ आली आहे. याबाबत संबंधित विभागाल विचारले असता त्यांच्याकडुन समाधानकारक उत्तर मिळत नाही व समस्या सोडविण्यासाठी  कोणतीही कारवाई केल्या जात नाही. त्यामुळे आता शहरात गंभीर परीस्थिती निर्मान झाली आहे. न.प. सदस्यांना नागरीकांच्या प्रश्नाचे उत्तर देणे सुध्दा कठीण झाले आहे. त्यामुळे पाण्याची ही समस्या तत्काळ निकाली काढावी अन्यथा तिव्र आंदोलन करण्याची चेतावणी भाजपाचे नगरसेवक संजय मोटवाणी, सौ. निलीमा शर्मा, सौ. सुरेखा तांडेकर,सौ. दीपाली मिसाळ, संजय पूरसाम, अजय हजारे यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन दिली आहे. निवेदनानंतर येत्या काही दिवसातच पाणीपुरवठा सुरळीत व स्वच्छ करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी रविंद्र  पाटील यांनी दिले आहे.

 

Time – 07:30 AM