एस.टी. आगार परीसरात वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न – अधिकारी- कर्मचाऱ्यांनी आगार परीसरात केली वृक्ष लागवड

0
894
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )

 

राज्य शासनाच्या दोन कोटी वृक्ष लागवडीच्या योजनेअंतर्गत नुकताच एस.टी. आगारातर्फे परीसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. .
महाराष्ट्र राज्यातील वनांचे प्रमाण २० % वरून ३३ % वर नेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वन सप्ताहामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतलेला आहे. अशातच राज्यभरात लोकसहभागातून वृक्षलागवडीचे `हरित मिशन’ राबविले जात असतांना स्थानिक एस.टी. आगार परीसरात सुध्दा वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आगारातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपन केले. पाणी टंचाईवर मात आणि पर्यावरणाचे रक्षण करणे यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायले हवेत असे मत उपस्थितांनी व्यक्त  केले.
यावेळी आगारातील माणिकराव वाडेकर, श्री. उईके, सौ. डोळस, प्रविण घाटे, श्री. सोनटक्के, राजु सानप, स्वप्नील ईश्वरकर, राम वानखडे, श्री. नौरंगे, श्री. रीठे, श्री. खाकसे, श्री. केवट, श्री. चौधरी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.