सरकारनियुक्त ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती’ विसर्जित करा ! – ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ

0
1437
Google search engine
Google search engine

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पंढरपूर येथे ‘वारकरी संत संमेलना’चे आयोजन

आज पंढरपूर येथे वारकरी ‘भजनी आंदोलन’ करणार !

जे सरकारने स्वतःहून करणे अपेक्षित आहे, त्यासाठी वारकर्‍यांना आंदोलन करावे लागणे, हे सरकारला लज्जास्पद आहे !

‘वारकरी संत संमेलना’त उपस्थित वारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ

 

पंढरपूर – मंदिराचे रक्षण करण्यासाठी संप्रदाय आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी सर्व भेद विसरून संघटितपणे कार्य करायला हवे. धार्मिक परंपरांशी कोणतीही तडजोड न करता प्रथा, परंपरा, धार्मिक कृती पाळायला हव्यात. तसे होत नसल्याने सरकारने नियुक्त केलेली ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती’ विसर्जित करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ यांनी केली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने  येथील स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘वारकरी संत-संमेलना’त ते बोलत होते. या वेळी वारकरी संप्रदायातील पदाधिकारी, तसेच हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

 डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यामुळेच आम्ही सनातनशी जोडले गेलो, याचा अभिमान वाटतो !  ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले गेले आहे. हे पुरोगाम्यांचे षड्यंत्र आहे. डॉ. तावडे यांनी अत्यंत तळमळीने आणि चिकाटीने हिंदूसंघटनाचे कार्य केले. हिंदु धर्माच्या उत्कर्षासाठी कठोर परिश्रम घेणारे डॉ. तावडे यांना त्यांनी न केलेल्या गुन्ह्यासाठी पुरोगाम्यांच्या अट्टहासापोटी कारावास सोसावा लागणे, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. डॉ. तावडे यांनीच आम्हा सर्वांना सनातनशी जोडले, याचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतो. डॉ. तावडे यांची लवकरात लवकर मुक्तता व्हावी आणि ते निर्दोष आहेत, हे सर्व जगाला कळावे, यासाठी मी ईश्‍वरचरणी प्रार्थना करतो. ‘आज हिंदुत्वाच्या कार्यासाठी त्यांची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांची उणीव भासते’, असे सांगतांना ह.भ.प. जवंजाळ महाराज यांचा कंठ दाटून आला होता.’

ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ पुढे म्हणाले,

‘‘आषाढी एकादशीच्या दिवशी अनेक राजकीय नेते पंढरपूरला आले होते. त्या वेळी वारकर्‍यांनी ‘मंदिर समिती बरखास्त करावी’, अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत आणि मंत्रीमंडळातील अन्य सदस्य यांच्याकडे केली होती. यावर त्या सर्वांनी ‘मंदिर समितीच्या बरखास्तीविषयी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून ६ जुलैपर्यंत सरकारचा निर्णय कळवू’, असे आश्‍वासन दिले होते. तथापि ते पाळले नाही. याच्या निषेधार्थ ८ जुलै या दिवशी दुपारी ३ ते ५ या वेळेत महाद्वार येथे वारकर्‍यांच्या वतीने ‘भजनी आंदोलन’ करण्यात येणार आहे. शासन विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या कारभाराविषयी उदासीन असून जोपर्यंत ही समिती बरखास्त होत नाही, तोपर्यंत वारकरी संप्रदाय कोणतेही सरकारी सत्कार स्वीकारणार नाहीत.’’

हिंदु जनजागृती समितीचे पंढरपूर जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे यांनी या ‘वारकरी संत संमेलना’चे प्रस्ताविक केले. या संमेलनात इतर मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार पुढीलप्रमाणे.