पत्रकारांवरील खोटे गुन्हे मागे घेवून पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करा – तिसऱ्या आघाडीतर्फे विभागीय आयुक्तांना निवेदन. तानाशाही घटनेचा नोंदविला निषेध

0
1176
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे  – (शहेजाद खान )
अमरावती जिल्हयातील चांदुर रेल्वे येथील पत्रकार प्रशांत कांबळे व अभिजित तिवारी, गुड्डु शर्मै यांच्यावर पोलीसांनी दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेवून त्यांना अमानुष मारहाण करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आम आदमी पार्टीचे विदर्भ कार्यकारीणी सदस्य नितीन गवळी यांच्या नेतृत्वात तिसऱ्या आघाडीच्या वतीने अमरावती विभागीय आयुक्तांना सोमवारी दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे.

लोकशाही राज्य असलेल्या भारतीय राज्यघटनेच्या चार आधारस्तंभापैकी प्रसारमाध्यमे हा चौथा आधारस्तंभ आहे. मात्र या आधारस्तंभाला भक्कम आधार देणार्‍या पत्रकारांची दिवसेंदिवस गळचेपी केल्या जात आहे. पत्रकार हा निर्भिडपणे लिखाण करुन वाईट प्रवृत्तीचे बुरखे फाडून या प्रवृत्तींना चारचौघात उघडे पाडत असतो. व पत्रकार हा सरकार आणि जनता यामधील एक महत्वाचा दुवा असून जनता आणि सरकार या दोघांना सहकार्य करण्यात पत्रकारांची महत्वाची भूमिका आहे. मात्र महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस पत्रकारांवर हल्ले होत आहेत. त्यांना जिवे मारले जात आहेत. या प्रकारामुळे एकूणच लोकशाही प्रक्रिया धोक्यात आली आहे. देशात आणि राज्यात आतापर्यत अनेक पत्रकारावर हल्ले झाले असून यामध्ये अनेक पत्रकारांना आपला जिव गमवावा लागला आहे. अशातच अमरावती जिल्हयातील चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मोगरा गावातील एका १७ वर्षीय अल्पवयीन युवतीने चांदुर रेल्वे स्टेशनवर रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना १७ जुन रोजी  घडली. मात्र घटनेच्या ७-८ तासानंतरही आरोपींना अटक न झाल्यामुळे नातेवाईकांनी शवविच्छेदनानंतर शव ताब्यात घेण्यास नकार दिला. चांदुर रेल्वे पोलीसांनी दिरंगाई केल्यामुळे शहरात  रात्री ११.३० वाजता तणाव निर्मान झाला होता. यामध्ये ४००-५०० लोकांच्या जमावानी पोलीस स्टेशनला घेराव घातला असतांना दंगा नियंत्रन पथकाच्या कर्मचाऱ्यांनी अमानुष लाठीचार्ज केल्यामुळे प्रकरण आणखीच चिघडळे होते. यामध्ये पोलीसांनी जमावातील काही गाववासीयांसह वृत्तसंकलनासाठी गेलेल्या शहरातील पत्रकार प्रशांत कांबळे व अभिजित तिवारी या दोन युवा पत्रकारांवर आकस ठेवून तेथील ठाणेदार व पोलीसांनी अमानुष मारहाण करुन त्यांना तुरुंगात डांबले तसेच पत्रकार गुड्डु शर्मा यांच्यावरही विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. त्यामुळे या तीनही पत्रकारावरील व सामान्य नागरीकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे व पोलीस प्रशासन करीत असलेल्या तानाशाहीपध्दत राबविणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी अशी मागणी तिसऱ्या आघाडीतर्फे करण्यात आली. याच दरम्यान मंगरूळ दस्तगिर येथे पोलीसांच्या तानाशाही धोरणामुळे एका इसमाने फास लावुन घेतला. अशा तानाशाही घटनेचा तिसऱ्या आघाडीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. चांदुर रेल्वे शहरामध्ये अशा तानाशाही पोलीस खात्यांच्या विरोधात मोठा उद्रेकसुध्दा झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाती गंभीरतेने दखल घ्यावी अशी मागणी भा.क.प.चे कॉ. विनोद जोशी, आम आदमी पार्टीचे नितीन गवळी, जनता दलाचे मेहमुद हुसैन, शिवसेनेचे बंडुभाऊ यादव, शेतकरी संघटनेचे राजाभाऊ भैसे, मा.क.प.चे रामदासजी कारमोरे, आदीवासी युवा क्रांती दलाचे उमेश मडावी, आपचे विनोद लहाने, अैड. नितीन उसगांवकर, महेश देशमुख आदींनी अमरावती विभागीय आयुक्तांना सोमवारी दिलेल्या निवेदनातुन केली आहे..