२२ जुलैला अमरावती येथे प्रसार माध्यम कार्यशाळा  सहभागासाठी आवाहन

0
962
Google search engine
Google search engine

 

 

 

नागपूर/ अमरावती :

 

केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत कार्यरत नागपूर येथील पत्र सूचना कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय- अमरावती यांच्‍यासहकार्याने, शनिवार दिनांक २२ जुलै, २०१७ ला हॉटेल ग्रेस-इन, महानगर पालिका संकुल, राजापेठ, अमरावती येथे प्रसारमाध्‍यम कार्यशाळा –‘वार्तालाप’चे  सकाळी१०.३० ते सायंकाळी ५.१५ या कालावधीत आयोजन करण्‍यात आले आहे. अमरावती श्रमिक पत्रकार संघ आणि अमरावती जिल्‍हा पत्रकार संघ या संघटनांचे या कार्यशाळेसाठी विशेष सहकार्य लाभले आहे.

‘जनमाध्‍यम’ या अमरावती येथील दैनिकाचे मुख्‍य संपादक श्री.प्रदीप देशपांडे यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन होणार असून ‘तरुण भारत’चे निवृत्त मुख्य संपादक, श्री. सुधीर पाठक,  याप्रसंगी बीजभाषण करतील. राज्‍यशासनाच्‍या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्‍या अमरावती येथील विभागीय कार्यालयाचे उपसंचालक श्री. राधाकृष्‍ण मुळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील.  कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ सकाळी ११.०० ते दुपारी १२.०० या कालावधीत  होईल.

उद्‌घाटन सत्रानंतर  पत्रकारांसाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले असून या  कार्यशाळेत तीन तांत्रिक सत्रामध्ये ७ व्याख्याने होणार आहेत.  दुपारी १२.०० ते १.४५ दरम्यान होणा-या प्रथम तांत्रिक सत्रामध्ये  ‘विकास संवादामध्‍ये पत्रकारांची भूमिका : स्‍थानिक वृत्‍त – राष्‍ट्रीय दृष्टिकोन’  या विषयावर ‘द इंडियन एक्सप्रेस’ या दैनिकातील नागपूर येथील वरिष्‍ठ संपादक श्री. विवेक देशपांडे मार्गदर्शन करणार आहेत.‘आपत्‍ती-व्‍यवस्‍थापनामध्‍ये वृत्‍तपत्रे आणि समाजमाध्‍यमांची भूमिका’ या विषयावर महाराष्‍ट्र टाईम्‍स, नागपुरचे विशेष प्रतिनिधी श्री. मंगेश इंदापवार विचार व्‍यक्‍त करतील. तसेच, अमरावती येथील सामाजिक कार्यकर्त्‍या,लेखिका रजिया सुलताना‘महिला, विकास आणि पत्रकारिता’ या विषयावर प्रकाश टाकतील.

दुपारी २.३० ते ४.१५ दरम्यान होणा-या   दुस-या तांत्रिक सत्रात आकाशवाणी, पुणेचे उपसंचालक(वृत्‍त), श्री नितीन केळकर हे ‘कृषी संकटाच्‍या वेळी यशकथांची समर्पकता’ या विषयावर व्याख्यान देतील. ‘भारतीय जनसंवाद संस्‍था आणि विकास संवाद’ या विषयावर भारतीय जनसंवाद संस्‍थेच्‍या अमरावती विभागीय केंद्राचे प्रमुख श्री. नदीम खान  मार्गदर्शन करतील. ‘वस्तू आणि सेवा कर-कायदा : सकारात्मक पैलू’ या विषयावर  अमरावती येथील उप आयुक्‍त(जीएसटी) डॉ. मुकुल तेलगोटे हे विवेचन करतील.

शेवटच्या तांत्रिक सत्रामध्ये  पत्र सूचना कार्यालय, नागपूरचे उपसंचालक श्री संजय आर्वीकर  ‘विकास-संवाद आणि पत्र सूचना कार्यालय’  या विषयावर  सादरीकरण करतील. प्रत्‍येक व्‍याख्‍यानसत्रांनंतर प्रश्‍नोत्‍तर सत्रही आयोजित करण्‍यात आले आहे. सायंकाळी ४.४० ते ५.१५ दरम्यान प्रतिसाद- संकलन व कार्यशाळेचा समारोप होईल.

या कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणा-या पत्रकारांनी आपली नावे nagpurpib@gmail.com या ईमेलवर, अथवा पत्र सूचना कार्यालय, नागपूरचे दूरध्‍वनी क्र. 0712-2561769/8275710072 यावर दिनांक १४ जुलै,२०१७ पर्यंत पाठवावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

***