राज्य विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन 24 जुलैपासून

0
644
Google search engine
Google search engine

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2017चे तिसरे (पावसाळी) अधिवेशन 24 जुलै 2017 पासून सुरु होणार आहे. हे अधिवेशन 11 ऑगस्ट 2017 पर्यंत चालणार आहे. या 19 दिवस चालणाऱ्या अधिवेशनात चार सुट्टयांचे दिवस असून एकूण कामकाजाचे 15 दिवस  असणार आहेत. कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

शनिवार, 29 जुलै 2017 रोजी बैठक होणार नाही तर रविवार, 30 जुलै 2017 आणि रविवार, 6 ऑगस्ट 2017 रोजी सार्वजनिक सुट्टी असणार आहे. सोमवार, 7 ऑगस्ट 2017 रोजी येणाऱ्या रक्षाबंधन निमित्ताने कामकाज होणार नाही. त्या ऐवजी शनिवार, 5 ऑगस्ट 2017 रोजी कामकाज सुरु राहणार आहे, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी दिली.यावेळी विधानसभा कामकाज ठरविताना विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह विधानसभेतील पक्षांचे गटनेते व वरिष्ठ सभासद उपस्थित होते. त्याचप्रमाणे विधानपरिषदेचे कामकाज ठरविताना विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह विधानपरिषदेतील सर्व पक्षांचे गटनेते, वरिष्ठ सभासद उपस्थित होते.