कोल्हापूर येथे चीन आणि पाक यांचे ध्वज, तसेच चिनी वस्तूंच्या फलकांची होळी !

0
1105
Google search engine
Google search engine

कोल्हापूर

 

वारंवार भारतविरोधी भूमिका घेणाऱ्यां चीनला धडा शिकवण्यासाठी सरकारने अधिकृतपणे चिनी वस्तूंचा वापर न करण्याविषयी जाहीर भूमिका घ्यावी आणि शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी मेड इन चायनाच्या वस्तू खरेदी आणि विक्री करू नये, असे आवाहन करून समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या वतीने आणि पतित पावन संघटनेच्या नेतृत्वाखाली चीन आणि पाकिस्तान या देशांच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांनी ११ जुलैला दुपारी १२.३० वाजता छत्रपती शिवाजी चौक येथे निदर्शने केली. या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी चीन आणि पाकिस्तान यांचे ध्वज आणि चिनी ड्रॅगन अन् वस्तूंच्या फलकाला चपलांचे फटके मारून त्याची होळी केली. १० जुलैला अमरनाथ यात्रेकरूंवर आतंकवाद्यांनी आक्रमण करून ८ यात्रेकरूंना ठार मारल्याविषयी याचा हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तीव्र निषेध केला. या वेळी चीन आणि पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.