…आणि अनिकेतला पाण्यात ढकलून पूजाने काढला पळ

0
512
Google search engine
Google search engine

आपल्या आवडत्या कलाकारांच्या खाजगी आयुष्यातील गुजगोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता अनेक चाहत्यांना असते. खास करून, आवडती डिश, फेव्हरेट कलर तसेचत्यांची प्रेम प्रकरणं अशा अनेक गोष्टीचा मागोवा हि चाहतेमंडळी घेत असतात. अश्या ह्या चाहत्यांसाठी, एक गमतीदार बातमी आहे.

श्रेयश जाधव निर्मित आणि समीर हेमंत जोशी दिग्दर्शित बसस्टॉप सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक भन्नाट किस्सा आहे. तो म्हणजे, पुजाला पाण्याची फार भितीवाटते त्यातही स्विमिंग पूल म्हटलं तर नको रे देवा अशी अवस्था पूजाची होते. मात्र सिनेमाच्या एका सीनसाठी पुजाला पाण्यात उडी मारावी लागणार होती. अनिकेतविश्वासरावला पाण्यात धक्का मारून तिला स्वतः पाण्यात उडी मारायची होती, त्यानुसार सगळे ठरले देखील. दिग्दर्शकांनी अॅक्शन म्हंटले, आणि पूजाने अनिकेतलापाण्यात ढकलले, मात्र स्वतः पाण्यात उडी मारायचे सोडून तीने चक्क पळच काढला.

पूजाच्या या कृतीमुळे टीममध्ये सर्वत्र हशा पिकला. मात्र रिटेकमध्ये पूजाने हिम्मत करुन सीन पूर्ण केला. अशी हि चित्रीकरणादरम्यान झालेली छोटीशी गम्मत जरीअसली, तरी याहून अधिक भन्नाट गोष्टी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यात पूजा आणि अनिकेतबरोबरच  अमृता खानविलकर, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, रसिकासुनील, अक्षय वाघमारे, मधुरा देशपांडे, सुयोग गोरे ह्या कलाकारांची धम्माल देखील पाहायला मिळणार आहे. पडद्यावरच्या या सर्व कलाकारांच्या गंमतीजमती २१ जुलैलाप्रेक्षकांना आपल्या नजीकच्या सिनेमागृहात पाहता येणार आहे.