15 जुलै ला तापडिया मॉल मध्ये होणार “तुझ्या रंगात” गाण्याचं लॉन्चिंग

0
1087
Google search engine
Google search engine

अमरावती :-

किमया मुझिक प्रस्तुत “तुझ्या रंगात” या गाण्याची विदर्भातील प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते आता ती प्रतीक्षा संपली आहे येत्या 15 तारखेला किमया मूझिक या यूट्यूब चॅनलवर हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे,
या गाण्याच्या मुख्य भूमिकेत यूट्यूब स्टार रवि वानखडे असून त्यांच्या साथीला भावना भोपाले या आहेत, या गाण्याचे दिग्दर्शक पवन वाकोडे हे असून प्रोडुसर उमेश श्रीखंडे आहेत, प्रोडक्शन हेड विनय वानखडे तसेच चेतन ठाकूर आणि वैष्णवी निंभोरकर यांनी या गाण्याला आवाज दिला आहे, या गाण्याच्या मुख्य भूमिकेत असणारे रवि वानखडे एक हास्य कलाकार असून त्यांचा व्हिडिओला लोकांचा भरपूर प्रतिसाद असतो, आता काही तरी वेगळं करण्याच्या प्रयत्न रवि वानखडे व त्यांची टीम करत आहे, या सोशल मीडियाचा उपयोग आपली कला लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न सर्व कलाकारांनी करायला हवा. येणार गाणं हे नक्की बघा आणि भरभरून प्रेम द्या.