मालेगावात गुप्त धन काढणारी टोळी जेरबंद मालेगाव पोलिसांची कार्यवाही

0
896
Google search engine
Google search engine
विनोद तायडे /वाशीम
मालेगाव  शहरात दि 29 जून ला  मध्यरात्रीच्या सुमारास गुप्तधन शोधणारी टोळी कुटे वेटाळात  घरातील गुप्त धन खोदून काढत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळावर जाऊन टोळी ला जेरबंद केले आहे  टोळी करणाऱ्या  ४ जणांना मालेगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे
 यावेळी गजानन महादेव कुटे ,आसिफखान अजिजखान रा शिरपूर ,शेख ताहीर शेख वाहेर ,विठ्ठल नारायण उर्फ भागवत बोबळे, नारायण उर्फ भागवत बोबळे , सौ पार्वती गजानन कुटे यांच्या जवळ गुप्त धन काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन नारळ, पांढऱ्या रंगांचा रुमाल ,धोतर ,टोपी ,कपडा,10 लिंबू आदी साहित्य आढळले . पोलिसांनी या सहा जणांवर गुन्ह्यांची नोंद केली आहे. पोलिसांनी आसिफखान अजिंजखान ,शेख ताहेर शेख वाहेर,गजानन कुटे, विठ्ठल नारायण उर्फ भागवत बोबळे यांना अटक केली आहे . पुढील तपास ठाणेदार सुरेश नाईकनवरे करीत आहेत