दंगलीच्या वेळी अधिवक्त्यांनी निरपराध हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी ठामपणे उभे रहायला हवे ! – अधिवक्ता चेतन मणेरीकर

0
661
Google search engine
Google search engine

धर्मांधांकडून हिंदूंवर अनेक प्रकारचे अत्याचार करण्यात येतात; मात्र पोलिसांचा ससेमिरा हिंदूंच्या मागे चालू होतो. अशा वेळी निरपराध हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी अधिवक्त्यांनी एकजुटीने आणि ठामपणे उभे राहिले पाहिजे. अशा वेळी अधिवक्त्यांनी पुढाकार घेऊन विविध शासकीय यंत्रणांवर सनदशीर मार्गांचा अवलंब करत योग्य तो दबाव निर्माण केला पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतीकारकांच्या मागे स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक उभे रहात होते. ती भूमिका सध्याच्या अधिवक्त्यांनी निभावणे आवश्यक आहे.