*आप च्या मदतीने गोल्डन किड्स शाळेतील शिक्षकांचे उपोषण यशस्वी*

0
749
Google search engine
Google search engine

अमरावती / विशेष प्रतिनिधी/-

गोल्डन किड्स शाळेतील शिक्षक 10 जुलै 2017 पासुन जिल्हाधिकारी कार्यालया समोर आपल्या विविध मागण्यासाठी आमरण उपोषणाला बसले होते संस्था चालकाने नियमबाह्य पद्धतीने अतिरिक्त ठरवुन त्यांना शाळेतुन काढण्याचा कट रचला होता शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करत होते तेव्हा उपोषण सुरु असतांना आप च्या कार्यकर्त्यांनी न्याय मिळावा म्हणुन प्रयत्न सुरु केले दिनांक 14 जुलै रोजी निवासी जिल्हाधिकारी व शिक्षण विभागातील अधिकारी तसेच आप चे पदाधिकारी यांची चर्चा झाली चर्चेमुळे त्याच दिवशी शिक्षण विभागाने आपल्या चौकशीचा अहवाल सादर केला

त्यात संस्थेच्या अनियमिततेच्या अनेक बाबी उघडकिस आल्या मात्र उपोषणाच्या मागण्या तशाच राहिल्या उपोषणातील पाचव्या दिवशी उपोषण कर्त्या शिक्षिका कु हेमा देशपांडे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले

सहाव्या दिवशी उपोषणकर्त्या शिक्षिका कु माधुरी मडघे यांची प्रकृती अधिक बिघडायला सुरुवात झाली होती पुन्हा मा उप जिल्हाधिकारी श्री परदेशी, उपसंचालक श्री राठोड शिक्षणाधिकारी श्री पानझडे, परिक्षक श्री राजगुरे आप चे पदाधिकारी व उपोषणकर्ते शिक्षक श्री किरण गुडधे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा सुरु झाली अर्धा तास चर्चा झाली व श्री परदेशी सरांनी शिक्षण अधिका-यांना एका तासात आदेश काढण्यास सांगितले 

आदेशानुसार

1) संस्थेची सर्व शाळेतील बिंदु नामावली मा आयुक्त ( मावक ) यांच्या कार्यालयातुन प्रमाणित करणे

2) संस्थेतील सर्व शाळेतील कर्मचारी सेवा जेष्टता यादी करणे

याबाबींची लवकरात लवकर पुर्तता केल्याशिवाय कोनालाहि अतिरिक्त करु नये व तीनही शिक्षकांना समायोजन करण्याचा असा आदेश काढला

मागण्या पुर्ण झाल्याने दिनांक 15 जुलै रोजी तहसिलदार श्री राउत यांच्या हस्ते ज्युस पिउन उपोषण सोडण्यात आले

गोल्डन किड्स शाळेतील सर्व शिक्षक, आप चे डॅा अलिम पटेल, डॅा रोशन अर्डक, श्री अशोक वानखडे, श्रीमती रंजना मामर्डे , श्री राहुल चव्हान, श्री संजय पांडव, श्री प्रमोद कुचे , श्री किशोर वानखडे , श्री प्रदिप चौधरी, रितेश तिवारी, साहु , रामेश्वर स्वर्गे, मुजिब खान, प्रविन काकड, मुबिन खान श्रीमती अनु वानखडे श्रीमती उज्वला पांडव तसेच श्री कराळे सर व श्री जोशी सर , श्री महेश तायडे, अजिंक्य पांडव , चद्रशेखर वंगळ यांचे सहकार्य लाभले