पावसाच्या पुनरागमनाने शेतकर्‍यांमध्ये चैतन्य

0
1015
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )

गेल्या अनेक दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडला होता. मात्र दोन दिवसापासुन पावसाने आगमन केल्याने शेतकर्‍यांमध्ये चैतन्य निर्माण झाले असल्याचे चित्र शहरासह परिसरात दिसत आहे.
मृगनक्षत्र सुरु होताच पावसाचे आगमन झाले होते. त्यामुळे चांदुर रेल्वे तालुक्यातील शेतकर्‍यांनी सोयाबिन, कपासी, तुर, मूग, उडीद सह आदि पिकांची पेरणी केली. पाऊसही अधुनमधुन जोमाने करू लागला. त्यामुळे शेतातील पिकही जोमदार दिसू लागले. शेतकरी वर्गात आनंदी वातावरण दिसू लागले असले तरी तो आनंद पाऊस बेपत्ता झाल्याने विरला गेला. परिणामी चिंतेचे सावट चेहर्‍यावर दिसू लागले. कारण शेतातील पिके ही करपू लागली होती. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे. अशांनी पिकांना पाणी दिले. मात्र कोरडवाहूतील पिके हे पिवळे पळू लागले होते. आता मात्र जोरदार पावसाचे आगमन झाल्याने चांदुर रेल्वे तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे.
पावसाच्या आगमनाने परिसरातील नाले ओसडून वाहत आहे. शेतकर्‍यांमध्ये पाणी साचले अनेक बंधारे ही पाण्याने भरल्या गेले आहे. या प्रदीर्घ विश्रांती नंतर पावसाने आगमन केल्याने परिसरातील शेतकर्‍यांच्या आशा वाढल्या गेल्याने आता शेतकरी शेतातील कामे करण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.