गायीची रस्त्यावर हत्या करणार्‍यांना कठोर शिक्षा द्या ! – हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड

0
618
Google search engine
Google search engine
चिंचवड – 
केरळमध्ये गायीची हत्या करणारा काँग्रेस पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते यांची कीव येते. गांधीजी गोहत्या बंदीच्या समर्थनार्थ असतांना त्यांच्या आदर्शांना काँग्रेसी कार्यकर्त्यांनी तिलांजली दिली आहे. ज्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर गाय कापली, त्यांनी रस्त्यावर डुक्कर कापून दाखवावे. गायीची रस्त्यावर हत्या करणार्‍यांनी राष्ट्रद्रोह केला असून त्यांना कठोर शिक्षा द्या, अशी क्षात्रयुक्त मागणी हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड यांनी केली. येथील चापेकर चौकात ११ जून या दिवशी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय, गोप्रेमी, राष्ट्रप्रेमी आणि धर्माभिमानी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
आंदोलनाच्या प्रारंभी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ. शैलजा मोरे यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेची पूजा, तर हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे आणि गोपूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी श्री गणेशाचा श्‍लोक म्हटला. आंदोलनाची सांगता अखिल पिंपरी-चिंचवड शिवजयंती महोत्सवचे श्री. कुणाल साठे यांनी सांगितलेल्या शिववंदनेने झाली. आंदोलनात सावरकर विचार मंच (निगडी प्राधिकरण), शिवराज्य संघटना या संघटनाही सहभागी झाल्या होत्या.