अंतिम सामन्यात इंग्लंडने भारताचा ९ धावांनी पराभव करू न विश्‍वचषकावर आपले नाव कोरले

0
560
Google search engine
Google search engine

आयसीसी महिला क्रिकेट विश्‍वचषकाच्या अतिशय चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने भारताचा ९ धावांनी पराभव करू न विश्‍वचषकावर आपले नाव कोरले. शेवटच्या काही षटकात धावांचा एकापाठोपाठ एक फलंदाज बाद झाल्याने भारताच्या महिला संघाने विश्‍वविजेता होण्याची संधी गमावली. भारताचा महिला संघ उपविजेता ठरला. इंग्लंडच्या २१९ धावांचा पाठलाग करताना भारताचा संघ ४८.४ षटकात २१९ धावांवर बाद झाला आणि अवघ्या नऊ धावांनी भारतीय महिला संघाला इतिहास घडवता आला नाही. पुनम राऊतने ८६ धावा फडकावून शेवटपर्यंत किल्ला लढवला. हरमनप्रीतने ५१ धावा काढून संघाला सावरले होते. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करीत शेवटच्या षटकांमध्ये विजय खेचून आणला.