*सैनिक धीरज सातपुते यांनी केले घाटलाडकी सर्कल मध्ये वृक्षाची लागवड*

0
838
Google search engine
Google search engine

बादल डकरे / चांदुर बाजार-

आपण  ज्या समाजात राहतो वाढतो त्या समाजाचे आपल्याला काही देणे लागते.देशाची संरक्षण करणारे भारतीय सैनिक धीरज सातपुते यांनी सुट्टीवर आलेल्या आपल्या गावी ब्रा.थडी ला त्यांनी घाटलाडकी परिसरात आणि ब्रा.थडी परिसरात  वृक्ष ची लागवड केली आहे.

धीरज सातपुते यांनी आपली कर्तव्य भारतीय सेने मध्ये पूर्ण पने  पार पाडली आहे.ज्या प्रमाणे ते देशाचे संरक्षण करतात त्याच प्रमाणे ते समाजाप्रती असलेले आपले दायित्व पूर्ण पने  पार पळत असतात.वृक्ष लागवडीची गरज आपल्या समाजाला आहे.याचीच योग्य परख घेऊन धीरज सातपुते यांनी वृक्ष लागवड केली असल्याची माहिती त्यांनी माध्यम याना दिली.वृक्ष लागवड करताना आशिष औतकर,अमोल निमकर,पंकज भगत,चक्रधर पोटे,इत्यादी मान्यवर.

श्री धीरज सातपुते 


आज वाढते प्रदूषण,पाऊस कमी येणे,या सर्व बाबीवर मत करायची असेल तर आपल्या प्रत्येक व्यक्तीने एक तरी वृक्ष लागवड करावी.ज्या प्रमाणाने आम्ही देशाचे संरक्षण देशाच्या सीमेवर करतो त्याच प्रमाणे समाजातील प्रत्येक व्यक्तीने लावलेल्या वुक्ष चे संरक्षण केले पाहिजे