घुईखेड येथील शेतकरी, शेतमजुरांना येण्या-जाण्यासाठी करावी लागते कसरत जलयुक्त शिवार योजनेतील साठवण बंधाऱ्यातील प्रकार

0
412
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )-
 
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत घुईखेड येथे साठवण बंधाऱ्याची निर्मीती करण्यात आली आहे. याच दरम्यान नाल्याचे खोलीकरण केल्यामुळे रस्त्याच्या ठिकाणी टाकलेल्या पाईपवरील माती खचल्याने तसेच पुढे टाकलेले मुरूम पाण्यात वाहुन गेल्याने शेतात जाणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच बैलबंडी, गाड्यासुध्दा नेणे अशक्य झाले आहे.
    जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभागातर्फे घुईखेड येथील खारोगल नाल्यावर १३४ लक्ष रूपये खर्च करून साठवण बंधारा बांधण्यात आला. तसेच नाल्याचे खोलीकरण करण्यात आले. यामध्ये मधात शेतकरी, शेतमजुरांना तसेच बैलबंडी, गाड्या जाण्यासाठी रस्ता असल्याने मोठा पाईप टाकण्यात आला व या पाईपवर माती टाकुन व पुढे काही प्रमाणात मुरूम टाकुन सस्ता करून देण्यात आला. मात्र पावसाळा सुरू होवुन काही दिवसच झाले असता त्या पाईपवरची माती पुर्णता खचल्यामुळे व पुढे काही प्रमाणात  टाकलेला मुरूम पाण्यात वाहुन गेल्याने जाणे – येणे करण्यासाठी शेतकरी, शेतमजुरांना कसरत करावी लागत आहे. बैलबंडी तसेच गाड्या ये- जा करणे तर पुर्णत: बंद झाले आहे. यानंतर आता धुव्वाधार पाऊस आल्यास या रस्त्यावरून शेतकऱ्यांचे शेतात जाणे सुध्दा बंद होऊन जाण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या अशा गलथान कार्यप्रणालीमुळे शेतकरी, शेतमजुरांना नाहक त्रास सहन लागत आहे. तरी लवकरात लवकर येण्या – जाण्यासाठी रस्ता सुरळीत करून द्यावा अशी मागणी परीसरातील शेतकरी, शेतमजुरांनी केली आहे..