​जिल्ह्यात ‘त्या’ एकाच मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड

0
610
Google search engine
Google search engine

बुलडाणा –  जिल्ह्यात फेब्रुवारी 2017 मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक पार पडली. यावेळी लोणार तालुक्यातील सुलतानपूर गावात मतदान केंद्र क्रमांक 57/6 वर मतदानादरम्यान मतदान यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. सुलतानपूर येथील मतदान केंद्रावरील केवळ ‘त्या’ एकाच मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाला होता. मतदान प्रक्रियेत वापरलेले इतर सर्व मतदान यंत्र योग्य होते. सर्व ठिकाणी प्रत्येक मतदान यंत्राची तपासणी करून ते सर्व यंत्र योग्य असल्याची खातरजमा करण्यात आलेली होती. त्यानंतरच मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. 

     या मतदान केंद्राचे फेरमतदान घेण्यात येवून 23 फेब्रुवारी 2017 रेाजी निकाल घोषीत करण्यात आला. जिल्ह्यात 60 जिल्हा परिषद व 120 पंचायत समिती मतदारसंघासाठी निवडणूक झाली होती. या निवडणूकीकरीता 1691 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच 3 हजार 382 मतदान यंत्र उपयोगात आणण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघाकरीता स्वतंत्र मतदान यंत्र होती. त्यापैकी जिल्हा परिषद मतदारसंघासाठी उपयोगात येणारी सुलतानपूर येथील 57/6 मतदान केंद्रामधील मतदान यंत्रात बिघाड समोर आला. छेडखानी करण्यात आलेली नाही.  याच ठिकाणी पंचायत समिती मतदारसंघाकरीता उपयोगात येणाऱ्या मतदान यंत्रात कुठलाही बिघाड नव्हता. तसेच जिल्ह्यात उर्वरित 1690 मतदान केंद्रांमधून अशाप्रकारची कुठलीही तक्रार जिल्हा प्रशासनाकडे आली नाही. सुलतानपूरच्या प्रकरणाविषयी कुठलीही निवडणूकीविषयक याचिका दाखल झालेली नाही, असेही पत्रकात नमूद आहे.