​आयुक्त अभिषेक कृष्ण यांचावर हक्कभंगाची सेवाहमी,दप्तर दिरंगाई ची कार्यवाही करा प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी

0
489
Google search engine
Google search engine

तहसीलदार याना निवेदन देताना  संघटनेचे पदाधिकारी


आमदार बच्चू कडू यांच्यावरील गुन्हा मागे घ्यावा – प्रहार 

*तहसीलदार चांदुर बाजार यांच्या मार्फत मुख्यमंत्री याना निवेदन*

बादल डकरे / चांदुर बाजार-

काल दिनांक 24 जुलै ला नाशिक येथे अपंग बांधवानी विविध मागण्यांसाठी महानगरपालिका समोर ठिय्या आंदोलन सुरू होते संबंधित प्रकरणा संबंधी चर्चा करण्यासाठी अपंग आणि शेतकरी यांची नेते म्हणून ओळख असलेले आमदार बच्चू कडू आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या कार्यलयात गेले असता त्यांनी अपंग बांधव यांच्या  पुनर्वसन कायद्याची अमलबजावणी तसेच 3% निधीच्या वाटपा संबंधी विचारणा केली असता आयुक्त कृष्ण यांनी अतिशय उर्मट पद्धतीने आणि हमरी तुमरी च्या वरचड भाषेत उत्तर दिल्याने आमदार कडू आक्रमक झाले.त्यामुळे अपंग आणि शेतकरी यांच्या आपली जबाबदारी चुकून उर्मट पने वागणाऱ्या नाशिक येथील मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यावर हक्क भंग प्रस्तवा नुशार कार्यवाही तसेच दप्तर दिरंगाई आणि सेवाहमी कायद्या अंतर्गत आयुक्त यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी चांदुर बाजार येथील प्रहार जनशक्ती पक्ष शहर तसेच ग्रामीण पदाधिकारी यांनी केली आहे.

मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी आमदार कडू यांना दिलेल्या चीड वागणुकी मुळे सर्व महाराष्ट्र तील लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे तरी आपण आमदार बच्चू कडु वरील 353 नोंदविलेले गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.तसेच मनपा आयुक्य नाशिक अभिषेक कृष्ण यांचा यावेळी नारेबाजी द्वारे निषेध करण्यात आला.यावेळी प्रहार शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष मंगेश देशमुख,गजेंद्र गायकी,मुन्ना बोंडे, सचिन पिसे,बबलू पावडे,प्रफुल्ल विघे, नितीन कोरडे,मुज्जफर हुसेन,रहमान भाई,शिशिर ठाकरे,शिशिर माकोडे,विनोद जवंजाळ,दीपक भोगाडे,सुभाषराव घोरमाडे इत्यादि उपस्थित होते.