​बुलढाणा जिल्ह्यात 3 तुर खरेदी केंद्र सुरू

0
498
Google search engine
Google search engine

• आज 114 शेतकऱ्यांच्या 1856 क्विंटल तूरीची खरेदी 

• 31 मे 2017 तुरीची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची तुर खरेदी

• 31 जुलै 2017 पर्यंत चालणार तुर खरेदी


बुलडाणा :-   सहकार व पणन विभागाच्या 21 जुलै 2017 रोजीच्या शासन निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांनी तुर खरेदी केंद्रावर 31 मे 2017 पर्यंत त्यांचे तुर विक्रीबाबत नोंद केलेली आहे. अशा शेतकऱ्यांची तुर राज्य शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेतंर्गत 31 जुलै 2017 पर्यंत खेरदी करण्यात येणार आहे. याबाबत सुचना प्राप्त झालेल्या आहे. त्यानुसार जिल्ह्यात 13 तुर खरेदी केंद्र संबंधित तालुक्याच्या कृषि बाजार समितीमध्ये सुरू करण्यात आलेली आहेत. या तुर खरेदी केंद्रावर तुरीची खरेदी करण्यात येत आहे. तरी तुर खरेदी करण्यासाठी आवश्यक सहकार्य व योगदान देण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे. 

  तरी 31 मे 2017 पूर्वी तुरीची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित तालुक्याच्या कृषि उत्पन्न बाजार समितीमधील बाजार समितीमध्ये तुर विक्रीस आणावी.  योजनेतंर्गत आज 25 जुलै 2017 रोजी जिल्ह्यात बुलडाणा तुर खरेदी केंद्रावर 6 शेतकऱ्यांची 150 क्विंटल तुर खरेदी करण्यात आली. तसेच मोताळा येथील केंद्रावर 10 शेतकऱ्यांची 150 क्विंटल, मलकापूर येथे 20 शेतकऱ्यांची 500 क्विंटल, नांदुरा येथे 7 शेतकऱ्यांची 70, जळगांव जामोद येथे 7 शेतकऱ्यांची 100, संग्रामपूर येथे 3 शेतकऱ्यांची 60, शेगांव येथे 35 शेतकऱ्यांची 450, खामगांव येथे 8 शेतकऱ्यांची 101 क्विंटल, चिखली येथील केंद्रावर 2 शेतकऱ्यांची 20,मेहकर येथे 2 शेतकऱ्यांची 50 क्विंटल, दे.राजा येथे 5 शेतकऱ्यांची 40, सिं. राजा येथे 2 शेतकऱ्यांची 15 क्विंटल आणि लोणार येथील खरेदी केंद्रावर 7 शेतकऱ्यांची 150 क्विंटल तुर खरेदी करण्यात आली. अशाप्रकारे एकूण 114 शेतकऱ्यांची 1856 क्विंटल तुर खरेदी करण्यात आली आहे.