शेतीच्या मशागतीची कामे आटोपली शेतकरी खरीप हंगामाकरीता सज्ज

0
1548
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद  खान)-



शेतकरी मशागतीची कामे आटोपून खरीप हंगामाकरिता सज्ज झाला असुन काळ्या आईला हिरवा शालु नेसविण्यास सज्ज झाला आहे. ट्रॅक्टर किंवा त्याच्या बैलगाडीने नांगरनी वखरनी केली. त्याच बरोबर शेतात असलेले तण कचरा कपाशीच्या काड्या साफ करण्याचे काम त्याच बरोबर तुरीचे कण सर्व शेतातील असलेली कामे मे महिण्यातच आटोपुन त्यापासुन खत निर्माण करण्याचाही प्रयत्न शेतकर्‍याकडुन केल्या जात आहे. काही शेतकर्‍यांनी बैलजोडी किंवा ट्रॅक्टर भाड्याने घेऊ न शेतीची पुर्णत: मशागत केली आहे. आता शेतकरीराजा पाण्याची आतुरतेने वाट पाहु लागला आहे. त्यासाठी त्याने उन्हा तान्हात राबुन उन डोक्यावर झेलत व घामाच्या धारा अंगावरून वाहत तो आता काळया आईला हिरवा शालु नेसविण्यास आतुर झाला आहे.
दरवर्षी पडणार्‍या पावसाच्या लपाछुपीच्या खेळामुळे शेतात पेरणीला लागणारी बियाणे लक्षात घेता खरिपाकरिता घरच्या लक्ष्मीचे दागीणे तर गहाण ठेवावे लागणार नाहित ना? अशी शंकाही त्याला मोठय़ा प्रमाणात सतावत आहे. काळया आईच्या कुशीतून निघणार्‍या पिकांच्या भरवशावर त्यांच्या संसाराचा गाडा चालु असतो. बियाणे खरेदीस जेव्हा तो बाजारात जातो तेव्हा कृत्रीम टंचाई निर्माण करुन त्याच्याकडून जास्तीचे पैसे उकळण्यात येते. बियाणे उपलब्ध असुन सुध्दा हवे असलेली बियाणे त्यांना मिळण्यास अडचण निर्माण होते. तेव्हा मात्र बळीराजाच्या नाकी नऊ येते. शेतीशिवाय दुसरा पर्याय नसतो. मग शेती तर करावी लागणार त्यासाठी लागणारे बियाणे खते घेण्यासाठी पैसाही शेवटी उरत नाही, शेवटी घरच्या लक्ष्मीचे दागीणे गहाण ठेवण्याचा प्रंसग त्यांच्यावर ओढवतो हे सर्व जरी तो करीत असला तरी त्याच्या मागे दृष्टचक्र सतत सुरूच असते. यावर्षी झालेल्या अती पावसामुळे उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. तर शेतातील पिके जळुन गेली होती. मागील वर्षी तुरीला भाव १० हजार रूपयापर्यत असल्याने यावर्षी बर्‍याच शेतकर्‍यांनी तुरीची पेरणी केली होती. त्यातही काही शेतातील अतीपावसामुळे तुरी करपल्या होत्या. परंतु मागील वर्षी भाव असलेला याही वर्षी तोच भाव मिळेल अशी आशा होती. मात्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकर्‍यांना तुरी बेभाव विकाव्या लागल्या आहे. शेतकर्‍यांना असे वाटत होते कि, तुरीत दहा हजार रूपये भाव मिळाला तर बि-बियाणे खताचा बजेट लागेल. पंरतु शेवटी शेतकर्‍यांना बि-बियाणे, खता करिता सावकाराचे दार ठोठवावे लागणार असुन जर शासनाने मालाला भाव दिला असता तर शेतकर्‍यांवर हि वेळ आली नसती एवढे मात्र खरे !