३०० रूपयाची लाच घेतांना महिला तलाठयाला रंगेहात पकडले – आमला विश्वेश्वर येथील घटना

0
1579
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे / शहेजाद खान –

एका महिला तलाठ्याला शेतकऱ्याकडून  शेतीच्या फेरफारसाठी ३०० रूपयाची लाच घेतांना
रंगेहात पकडल्याची घटना चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर गावी शुक्रवारी दुपारी
साडेबारा वाजता घडली. आरती रमेश कनोडीया (वय ३०) रा.चांदूर रेल्वे जि.अमरावती असे
त्या लाचखोर महिला तलाठ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार आमला विश्वेश्वर येथील मंगेश चर्जन यांनी आईचे माहेरचे नाव शेतीच्या
सातबारावर  बदलविण्यासाठी आमला विश्वेश्वरच्या तलाठी आरती कनोडिया कडे अर्ज केला.
त्यासाठी तलाठी कनोडिया मॅडम यांनी तक्रारकर्ता मंगेश चर्जन कडे ५०० रूपयाची मागणी
केली. तडजोडीनंतर ३०० रूपयात आईचे माहेरचे नाव शेतीचे सातबारा वरून बदलवुन देण्याचे
ठरले. मंगेश चर्जन यांनी अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती विभागाकडे धाव घेतली. अ‍ॅन्टी
करप्शन ब्युरो यांनी सापळ रचला. त्यामध्ये पंचा समक्ष तलाठी आरती रमेश कनोडिया व
त्यांचा सेवानिवृत्त कोतवाल जगत मोतीराम मोरे (वय ६२) रा.जळका जगताप ता.चांदूर रेल्वे
यांना मंगेश चर्जन कडून ३०० रूपयाची लाच स्विकारतांना रंगेहात पकडले. सदर कारवारी
अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती विभागाचे पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस
अधिक्षक विलास देशमुख, सुनिता नाशिककर, घटक प्रमुख आर.बी.मुळे यांचे
मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र जेधे, राहुल तसरे, महिला कर्मचारी माधुरी साबळे,
पोहकॉ प्रेमराज मावंदे ,नापोशि विनोद कुंजाम, अकबर खान यांनी कारवाई केली.