एअर इंडियातील केबीन क्रु 400 जागांसाठी मुलाखत पुर्वतयारी कार्यशाळा

0
1039
Google search engine
Google search engine

गोंदिया-

ग्रामीण भागातील होतकरु असलेल्या मुलींसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेच्या वतीने अर्जुनी/मोरगाव येथील प्रसन्ना लॉन येथे 29 व 30 जुलै रोजी एअर इंडियातील केबीन क्रु च्या 400 रिक्त जागांसाठी मुलाखत पुर्वतयारी कार्यशाळेचे आयोजन सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. कार्यशाळेचे उदघाटन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले हे करतील. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे हया असतील. विशेष अतिथी म्हणून खासदार सर्वश्री प्रफुल पटेल, नाना पटोले, अशोक नेते, आमदार सर्वश्री ना.गो.गाणार, प्रा.अनिल सोले, डॉ.परिणय फुके, गोपालदास अग्रवाल, संजय पुराम, विजय रहांगडाले, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, अर्जुनी/मोरगाव पं.स.सभापती अरविंद शिवणकर, सडक/अर्जुनी पं.स.सभापती कविता रहांगडाले, अर्जुनी/मोरगावच्या नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसूदन धारगावे यांची उपस्थिती राहणार आहे.
एअर इंडियातील केबीन क्रु च्या 400 रिक्त जागांपैकी अनुसूचित जातीसाठी 28, अनुसूचित जमातीसाठी 19, इतर मागासवर्गासाठी 153 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 200 पदे भरण्यात येणार आहे. यासाठी मुलींची शैक्षणिक पात्रता पदवी व त्यापेक्षा अधिक गुणवत्ता असावी. खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 27 वर्ष, इतर मागासवर्गीयांसाठी 18 ते 30 वर्ष आणि अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गासाठी 18 ते 32 वर्ष अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तरी इच्छुक तरुणींनी जास्तीत जास्त संख्येने 29 जुलै रोजी सकाळी 9 वाजता पदवी गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र व अन्य कागदपत्रांसह उपस्थित राहावे. असे आवाहन बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे यांनी केले आहे.