सिंहगड किल्याचा घाट रस्त्याचे काम मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करणार – प्रवीण पोटे- पाटील

0
641
Google search engine
Google search engine

पुणे:-


जिल्ह्यातील सिंहगड किल्ल्‌याच्या घाट रस्त्यासाठी ५ कोटी एवढी तरतूद राज्य शासनाने मंजूर केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आयआयटी कडून सूचना मागवून त्यानुसार काम करण्यात येणार आहे. मार्च २०१८ पर्यंत या रस्त्याचे काम पुर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम (उपक्रम वगळून) राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी अधिवेशनात माहिती दिली.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुणे जिल्हयातील सिंहगड किल्ल्‌याच्या घाट रस्त्यावरील दरडीबाबात सदस्य भीमराव तापकरी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना श्री पोटे-पाटील बोलत होते.

श्री. पोटे-पाटील म्हणाले, या रस्त्यावर काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडतात तसेच नागमोडी वळणे असल्याने वाहतुकीचा खोळंबाही होतो. या रस्त्यावरील सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण सर्वेक्षण आणि दरडी प्रवणक्षेत्राची पाहणी करण्यासाठी मुंबईतील आयआयटी यांना प्रस्ताव देण्यात आला होता. त्यांनी अभ्यासपूर्ण अहवाल दिल्यावर त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच हा रस्ता दोन टप्प्यात येतो ७.५० कि.मी. वन विभागाअंतर्गत आणि १.५० कि.मी. सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येत असल्याने दोन्ही विभागाच्या समन्वयाने तातडीने हे काम पूर्ण करण्यात येत असल्याचेही श्री पाटील यांनी सांगितले.

यावेळी सदस्य सर्वश्री अजित पवार, विजय काळे, पतंगराव कदम यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते.