चांदुर बाजार शहरातील अवैध धंदे बंद करा -अन्यथा पूर्वसूचना न देता आंदोलन छेळू :- श्री आनंद अहिर (सभापती बांधकाम समिती)

0
700
Google search engine
Google search engine

 

 पोलीस जिल्हाअधिक्षक अमरावती याना निवेदन

बादल डकरे / चांदुर बाजार 

 

स्थानिक चांदुर बाजार शहरामध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली असून प्रति चांदुर बाजार नगर परिषद मधील नगर सेवक आणि बांधकाम समिती सभापती यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक याना निवेदन देऊन 15 दिवसाच्या आता  अवैध धंदे बंद न झाल्यास आंदोलन करणार असल्याचे इशारा दिला.
चांदुर बाजार येथील शहरामध्ये वरली ,मटका,गावठी,दारू,इंग्लिश दारू,गौमास विक्री तसेच मोठ्या प्रमाणात गुटका विक्री सुरू आहे यांचा परिणाम हा नवीन युवका वर होत आहे त्यामुळे कमी वयोगटातील युवक वर्ग हा या अवैध धंद्यच्या कडे वळत आहे त्याचा परिणाम म्हणजे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण आणि त्या मध्ये युवकाची संख्या अधिक आहे.या अगोदरही अवैध धंद्या संदर्भात वारंवार निवेदन दिले आहे मात्र पोलीस प्रशासन कडून काहीच कार्यवाही झाली नाही.त्यामुळे समाजातील कायदा आणि सुव्यवस्थ ला तडा जात असल्याचे चित्र आहे. स्थनिक पोलीस प्रशासन याना शय तर देत नाही अशा प्रश्न शहरातील नागरिक समोर आहे तरी शहरामध्ये कोणत्या प्रकारचा कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला जबाबदार पोलीस प्रशासन राहतील आणि अवैध धंदे बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा हि आनंद अहिर आणि यावेळी दिला आहे.

 

श्री आनंद अहिर (सभापती बांधकाम समिती) –

वारंवार तोंडी सांगून सुद्धा पोलीस प्रसाशन या कडे दुर्लक्ष करीत आहे.स्थानिक पोलीस सुद्धा याना पाठराखण करीत आहे.त्यामुळे शहरातील वातावरण हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने घातक आहे त्यामुळे या सर्व संदर्भात आक्रमक झाल्याशिवाय पोलीस प्रशासन जागे होणार नाही.