ठाणेदार श्री मुकुंद कवाडे यांची दबंग कार्यवाही-मध्यप्रदेश मधून येणारी इंग्लिश एम डी दारू पकडली

0
789
Google search engine
Google search engine

बादल डकरे / चांदुर बाजार





सुप्रीम कोर्ट यांच्या निर्देशानंतर संपूर्ण देशामध्ये महामार्ग वरील 500 मीटर च्या आतील सर्व दारूचे दुकान बंद करण्याचे आदेश दिले होते.मात्र काहींनी बंद केले तर काहींनी सुरु.असेच शिरजगाव कसबा हे गाव मध्य प्रदेश च्या काठावर वसलेले आहे आणि या ठिकाणी ठाणेदार म्ह्णून मुकुंद कवाडे कार्यरत आहे.मध्य प्रदेश मधील खोमाई या गावामधून लोक इंग्लिश दारू ची वाहतूक करीत असल्याची माहिती ठाणेदार कवाडे यांना मिडाळी.दिनांक 8 जून 2017 ला सायकाळी 8 च्या सुमारास पाळा या ठिकाणी ठाणेदार कवाडे यांनी नाकाबंदी लावली आणि त्या दरम्यान
पोस्टे शिरजगाव (क) हद्दीत आरोपी 1) महेश आसणदास चंदानी वय 41 वर्षे रा. लालपूल,परतवाडा  2) सुनील श्यामराव सलामे वय 34 वर्षे रा. सिविल लाईन,परतवाडा  असे दोघे मोटरसायकल क्र.mh/27/n/9893 ने जात असतांना आरोपी चा  ताब्यातून इंग्लिश MD/दारू 72 बॉटल की.10,800 ₹ आणि एक हॅरो होंडा मोटारसायकल  किमत अंदाजे 30,000 ₹ असा व एक मोबाईल 1500 रु व 60 रु.नगदी असा एकूण 42,360/- ₹ चा मुद्देमाल जप्त करून आरोपीवर मु. दा.का. नुसार कारवाई करीत असल्याचे शिरजगाव कसबा येथील ठाणेदार मुकुंद कवाडे यांनी माध्यमांशी  बोलताना सांगितले.सादर कार्यवाही
ठाणेदार मुकुंद कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरजगाव पोलीस टीम यांनी केली.
*फोटो- ताब्यात घेण्यात आलेली दारू ,आरोपी आणि पोलीस टीम शिरजगाव कसबा*