चांदुर रेल्वे शहरात १ लाखाची चोरी, पोलीस मात्र सुस्त ! पोलीसांची घरच्यांकडुनच चौकशी, आरोपी फरारच

0
618
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद  खान)

स्थानिक गाडगेबाबा मार्केटस्थित अरीहंत ज्वेलर्सचे संचालक कमलचंद गुगलीया यांच्या धनराज नगरातील निवासस्थानी गुरूवारी मध्यरात्री चोरट्यांनी घरात प्रवेश करून १  लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. या घटनेनंतरही पोलीस प्रशासन मात्र सुस्तच दिसुन आले.
       धनराज नगरमधील कमलचंद गुगलीया यांच्या घराचा समोरील दरवाज्याचे काच फोडुन दरवाजा उघडला व घरात प्रवेश करून झोपलेल्या सर्वांना बेशुध्द केल्याचे समजते. यानंतर घरातील कपाट उघडुन सोनसाखळी १५ ग्रैम, अंगठ्या १० ग्रैम, कानातले असा ८३ हजार रूपयांच्या  ऐवजासह नगदी २१ हजार लंपास केले. अशी एकुन १ लाख ४ हजारांची चोरी झाल्याची माहीती मिळाली आहे. या घटनेनंतर सकाळी ही माहिती पोलीसांना देण्यात आली. पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला. मात्र सायंकाळच्या सुमारास पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीसांच्या अशा कासवगतीपणामुळे चोरट्यांचा खरच शोध लागेल का ? हा ही एक संशोधनाचा विषय बनला आहे.

१) चोर – पोलीस मौसेरे भाई
चोरट्यांचा शोध लावण्याऐवजी पोलीस गुगलीया यांच्या घरच्यांचीच चौकशी तासनतास करत बसले. म्हणजेच चोरट्यांना मोकाट सोडुन तक्रार दाखल करणाऱ्यांनाच उलट त्रास देत आहे. पोलीसांच्या अशा वागण्यावरून ‘चोर- पोलीस मौसेरे भाई’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
२) एक कपाट उघडले, दुसरे का नाही ?
चोरट्यांकडुन एक कपाट उघडल्यामुळे त्यांनी एकाच कपाटातील ऐवज लंपास केला व दुसरे कपाट उघडले नसल्यामुळे ते एकाच कपाटातील ऐवज घेवुन पसार झाले. पोलीस पंचनामा करायला आले असता चोरट्यांनी एकाच कपाटातील ऐवज का नेला ? दुसरे कपाट उघडले का नाही असा आगळावेगळा प्रश्न फिर्यादी ला विचारला. या प्रश्नाचे उत्तर फिर्यादी ला कसे माहित राहणार याचे भानसुध्दा पोलीसांना नसल्याचे दिसुन आले.