बातमीची विश्वसनीयता जपण्यासाठी पत्रकारांनी दक्ष राहणे गरजेचे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
701
Google search engine
Google search engine
मुंबई :- आजचा काळ हा बातम्यांच्या निर्मितीचा काळ आहे. समाजमाध्यमांतून अनेक बातम्या त्यांची विश्वसनीयता न तपासता दिल्या जातात. अशा वेळी पत्रकारांनी अधिक दक्ष राहणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
            मुंबई प्रेस क्लबच्या ‘रेड इंक ॲवार्ड 2017’ वितरण समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष कुमार केतकर, सचिव धर्मेंद्र जोरे उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार विनोद दुवा यांना यावेळी जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
            श्री. फडणवीस म्हणाले की, कुठल्याही घटनेच्या किंवा बातमीच्या तीन बाजू असतात. एक बाजू प्रसार माध्यमांची, दुसरी बाजू राजकारण्यांची तर तिसरी बाजू तटस्थतेची. पण सध्या या तिसऱ्या बाजूकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. ज्येष्ठ पत्रकार विनोद दुवा यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करुन विनोद दुवा हे माझे आवडते पत्रकार राहिले असल्याचे सांगितले. राजकारणातील विनोदजींचा कार्यक्रम खूप आवडायचा, केवळ मनोरंजनासाठी टीव्ही बघितला जाण्याच्या काळात राजकीय घडामोडी संदर्भातील माहितीसाठी लोकांना टीव्हीशी जोडून ठेवण्याचे महत्वाचे काम विनोदजींनी केले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पत्रकारितेच्या विविध क्षेत्रातील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.        
पुरस्कारप्राप्त पत्रकारांची नावे पुढीलप्रमाणे :
जीवनगौरव पुरस्कार-विनोद दुवा
वर्षातील मानकरी-राजकमल झा-इंडियन एक्सप्रेस
विशेष प्रभाव पुरस्कार-राहुल कुलकर्णी-एबीपी माझा
मुंबई स्टार रिपोर्टर-गोविंद तुपे-सकाळ
अन्य पुरस्कारांमध्ये पत्रकारितेचे क्षेत्र, माध्यम, विजेत्याचे नाव आणि संस्थेची नाव अनुक्रमे पुढीलप्रमाणे :
राजकारण-मुद्रित माध्यम-राधाकृष्णन कंदथ-फ्रंटलाईन,
राजकारण-टीव्ही-श्रीनिवासन जैन- एनडीटीव्ही
विज्ञान आणि शोध-मुद्रित माध्यम-(1)नित्यानंद राव-द वायर (2) विराट मार्कंडेय-द वायर
विज्ञान आणि शोध-टीव्ही-आमीर रफीक पीरजादा-एनडीटीव्ही
मानवअधिकार-मुद्रित-(1)इप्सिता चक्रवर्ती-स्क्रोल.इन (2) रायन नक्श- स्क्रोल.इन,
मानवअधिकार-टीव्ही-(विभागून) (1)अभिसार शर्मा-एबीपी न्यूज (2) माया मिरचंदानी-एनडीटीव्ही
व्यापार-मुद्रित-सारिका मल्होत्रा-बिझनेस टुडे
व्यापार-टीव्ही-अर्चना शुक्ला-सीएनबीसी टीव्ही 18
बीग पिक्चर-मुद्रित-आशिष शर्मा-ओपन मॅगझिन, उपविजेता-कुनाल पाटील-हिंदुस्थान टाइम्स
पर्यावरण-मुद्रित-(विभागून)(1)तुषार धारा-फर्स्ट पोस्ट, (2) संजय सावंत- फर्स्ट पोस्ट, (3) श्रध्दा घाटगे- फर्स्ट पोस्ट, (4) निरध पांढरीपांडे- फर्स्ट पोस्ट, (5) राज मिश्रा-दैनिक जागरण
पर्यावरण-टीव्ही-राजेश कुमार-इंडिया न्यूज
क्रीडा-मुद्रित-स्वरुप स्वामीनाथन-द न्यू इंडियन एक्सप्रेस
क्रीडा-टीव्ही-विभागून (1) मौमिता सेन-इंडिया टुडे टीव्ही, (2) राजीव मिश्रा-इंडिया न्यूज/वन टीव्ही नेटवर्क
आरोग्य-मुद्रित-प्रियंका व्होरा-स्क्रोल.इन
आरोग्य-टीव्ही-अर्चना शुक्ला-सीएनबीसी टीव्ही 18
गुन्हे-मुद्रित-आलिया अल्लाना-फाऊंटेन इंक
गुन्हे-टीव्ही-अतिर खान-इंडिया टुडे टीव्ही
जीवनशैली आणि मनोरंजन-मुद्रित-कथकली चंदा-फोर्ब्स इंडिया
जीवनशैली आणि मनोरंजन-टीव्ही-बीजू पंकज-मातृभूमी न्यूज.