कौशल्य विकास वेबपोर्टलमध्ये बदल

0
540
Google search engine
Google search engine

नागपूर –

जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे नावात बदल करण्यात आला असून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर असे करण्यात आले आहेत. त्यासोबत वेबपोर्टल सुध्दा महास्वयम www.mahaswayam.in असे ठेवण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक संचालक प्र. वा. खंडारे यांनी दिली.
उद्योजकता विभागाच्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांचे पोर्टलसमवेत संचालनालयाचे महारोजगार संकेतस्थळ यांची सांगड घालण्यात आलेली आहे. कौशल्य विकास संस्थेचे संकेतस्थळ, संचालनालयाचे महारोजगार व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे महास्वयम रोजगार या संकेतस्थळाचे एकात्मिक संकेतस्थळ तयार करण्यात आले असून त्यास महास्वयम असे नाव देण्यात आलेले आहे. बेरोजगार उमेदवारांनी तसेच खाजगी व शासकीय आस्थापनांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात आले आहे.