अभिनेत्री रेखा आणि सचिन तेंडुलकर यांच्याकडे विज्ञापनांसाठी वेळ आहे; मात्र राज्यसभेसाठी नाही ! – खासदार नरेश अग्रवाल यांची टीका

0
454
Google search engine
Google search engine

नवी देहली – राज्यसभेचे सदस्य असलेले माजी क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री रेखा राज्यसभेत उपस्थित नसतात. यावर समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी राज्यसभेत त्यांच्यावर टीका केली. सचिन तेंडुलकर आणि रेखा यांना राज्यसभेत यायचे नाही, तर त्यांनी सरळ खासदारकीचे त्यागपत्र द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या दोघांकडे विज्ञापने करायला वेळ आहे, इतर ठिकाणी जायला वेळ आहे; मग राज्यसभेत यायला वेळ का नाही? राज्यसभेची खासदारकी घ्यायची आणि तिथले नियम पाळायचे नाहीत, याला काय अर्थ आहे? असेही प्रश्‍न त्यांनी विचारले. या दोघांना सुट्टी दिली आहे, असे उत्तर राज्यसभेचे उपसभापती जे.पी. कुरियन यांनी दिलेे. त्यांना अनुपस्थितीविषयी ताकीद दिली जाईल, असे कुरियन यांनी म्हटले. कला आणि क्रीडा या विभागांतून नामवंत व्यक्तींना खासदार म्हणून राज्यसभेवर पाठवले जाते.