रिसोड येथे शिवसेनेचा बंद – शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झालाच पाहिजे

0
659
Google search engine
Google search engine
वाशिम / महेंद्र महाजन /-


वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे  शिवसेनेने शेतकऱ्याचा  सातबारा कोरा झालाच पाहिजे व इतर मागण्यार्थ आज रिसोड येथे कडकडीत बंद पाळून शासनाचा निषेध  नोंदविला  शिवसेनेने दि 6 जून ला रस्ता रोको करून शेतकरी  यांच्या संपाला पाठिंबा शेतकरी। यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे ठिकठिकाणी शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन पेटले आहे .विविध प्रकारे शेतकरी शासनाचा निषेध नोंदवत आहेत ,.आज रिसोड येथे शिवसेनेने आक्रमक  भूमिका घेत दिनाक  7 जून ला रिसोड येथे  कडकडीत बंद पाळला. रिसोड शहरात दरम्यान सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. सराफा लाइन, भाजीमंडी, कापड दुकान,धान्य बाजार,फ्रुट व फेरीवाल्यानी स्वयंस्फूर्तीने बंद पाळून शेतकऱ्याच्या संपाला   पाठिंबा दर्शविला. शेतकऱ्याचा सात बारा कोरा झालाच पाहिजे शेतमालास हमी भाव मिळालाच पाहीजे  आदी मागन्यार्थ   शिवसेना जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ सानप यांच्या नेतृवात तालुका प्रमुख महादेवराव ठाकरे, शहर प्रमुख अरूण मगर ,युवासेना तालुका प्रमुख अँड.गजानन अवताडे, पंचायत समिती सदस्य नंदू घुगे शिवाजी सोनुने ,गजानन अवताडे,चाफेश्ववर गांगवे, अरुण मगर भागवत गवळी,प्रदीप खंदारे दत्त मगर,राहुल भुतेकर आदीं शिवसैनिकांनी सह  शेतकरी, व्यापारी,यांनी बंद बंद यशस्वी केला