प्रधानमंत्री पीक विमा योजना अर्ज स्वीकृतीसाठी पाच ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

0
778
Google search engine
Google search engine

अमरावती-

 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे.

पीक विम्यासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत 31 जुलै 2017 पर्यंत होती. मात्र,अधिकाधिक शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळावा.

या हेतूने शेतकऱ्यांचे अर्ज 5 ऑगस्टपर्यंत बँकेच्या शाखांमध्ये स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वाढीव कालावधीतील अर्ज केवळ बँकाद्वारेच स्वीकारले जातील. त्यासाठी जनसुविधा केंद्रांना (CSG) प्राधिकृत करण्यात आलेले नाही.

बँकांनी एक ऑगस्ट ते पाच ऑगस्ट या कालावधीत स्वीकारल्या जाणा-या अर्जाच्या नोंदी तसेच आकडेवारी स्वतंत्र ठेवावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.