घरकुल घोटाळेबाजांची चांदूर रेल्वे पोलीस चौकशी करणार- चांदूर रेल्वे एसडीपीओ राऊत यांचे ठाणेदारांना आदेश. गौतम जवंजाळ यांच्या एकाकी लढ्याला मिळणार यश

0
668
Google search engine
Google search engine



चांदूर रेल्वे /शहेजाद खान /–

बेघर व गरजुंच्या डोक्यावर छत असावे यासाठी महाराष्ट्र शासनाने गरीबांसाठी घरवूâल योजना
सुरू केली. परंतु चांदूर रेल्वे नगरपालीकेने चक्क नियम धाब्यावर बसवुन गरजवंत व गरीबांना
डावलून नगरपालीकेचे माजी नगरसेवक, न.प.कर्मचारी, अधिकारी व ज्यांना गरज नाही
अशांना घरकुल देऊन महाघरकुल घोटाळा केला. या घोटाळ्याला चांदूर रेल्वेचे सच्चे
समाजसेवक गौतम जवंजाळ यांनी वाचा फोडली. यातील दोषींवर कडक कारवाई करण्यात
यावी यासाठी ते मागील अनेक वर्षापासून एकाकी लढा देत आहे. अधिकाऱ्यांना घरकुल
घोटाळ्याचे पुरावे देऊनसुध्दा कारवाई होत नसल्याने शेवटी गौतम जवंजाळ यांनी दोषींवर
फौजदारी कारवाई करण्यासाठी पुराव्यासह थेट चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन गाठले. या प्रकरणी
चांदूर रेल्वे उपविभागीय पोलीस अधिकारी सुर्यकांत राऊत यांनी चांदूर रेल्वे ठाणेदारला या
घोटाळ्यातील दोषीची जंत्री जमा करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
महाराष्ट्राभर गाजलेला जळगाव घरकुल महाघोटाळ्याप्रमाणे चांदूर रेल्वे नगर परिषदेमध्ये
घरकुल महाघोटाळा झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांऐवजी घरकुलाचा लाभ माजी
नगरसेवक, नगर परिषद कर्मचारी, अधिकारी व ज्यांना घरकुलाची आवश्यकता नाही अशांना
देण्यात आला. घरकुल देतांना नियम धाब्यावर बसवुन एकाच घरी दोन-तीन घरकुल देण्यात
आले. काहींनी तर घरकुल न बांधताच सर्व रक्कम हजम केली. अनेकांनी तर बोगस कागदपत्रे
बनवुन नोकरीवर असलेल्या नातेवाईकांच्या नावाने घरवूâल लाटले. हा सर्व प्रकार तत्कालीन
मुख्याधिकारी,अभियंता व नगराध्यक्ष यांच्या संगनमताने राजरोजपणे झाला. हा महाघोटाळा
उघडकीस आणुन दोंषीवर कारवाई करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते गौतम जवंजाळ अनेक
वर्षापासून लढा देत आहे. यासाठी अनेक आंदोलने, उपोषण केली. स्थानिक लोकप्रतिनिधी
ते बडे अधिकाऱ्यांनि  चौकशीचे नौटंकी केली. तत्कालीन अभियंत्याने तर दोषींवर कारवाई
होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांना  आर्थिक रसद पोहचविली. प्रामाणिक आंदोलन करून व
भक्कम पुरावे देऊन सुध्दा कारवाई न झाल्याने जवंजाळ यांनी स्थानिक पोलीस स्टेशन व
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनकडे  रितसर तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये
जिल्हाधिकाऱ्यांनी  दोषींवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेशसुध्दा आहेत. या प्रकरणातील
दोषींची सखोल चौकशी चांदूर रेल्वे पोलीस करणार असुन चौकशीअंती दोषींवर फौजदारी
कारवाई करणार आहे तसे आदेश चांदूर रेल्वे उपविभागीय पोलीस अधिकारी सुर्यकांत राऊत
यांनी ठाणेदार ब्रम्हानंद शेळके यांना दिले आहे.