शिक्षकांच्या वतीने विद्यार्थ्यांना पोशाख वाटप – बग्गी येथील मनिराम महाराज विद्यालयातील उपक्रम

0
602
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान .)

तालुक्यातील बग्गी येथील शिवाजी शिक्षण संस्थाव्दारा संचालीत संत मनिराम महाराज विद्यालय येथे शिक्षकांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय पोशाखाचे वितरण बग्गी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश चवाळे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्री. कडू, स. शिक्षक श्री. मोटघरे उपस्थीत होते.
दरवर्षी अशाच प्रकारचे सामाजीक उपक्रम राबविण्यात स. शिक्षक श्री. मोटघरे यांचा मोलाचा वाटा असतो. अशा प्रकारचे उपक्रम प्रत्येक शाळेत राबविण्यात यावे जेणेकरून गरीब विद्यार्थांना मदत होईल असे मत प्रकाश चवाळे यांनी व्यक्त केले. यावेळी शाळेतील शिक्षक, कर्मचारीवृंद, विद्यार्थी उपस्थित होते.