राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी

0
695
Google search engine
Google search engine

दादर (मुंबई) येथे चिनी वस्तूंच्या विरोधात रणरागिणी एकवटल्या !

 

मुंबई – वर्ष १९६२ मध्ये हिंदी-चिनी भाई-भाई असे म्हणत चीनने भारताला दगा दिला होता. प्रत्येक भारतियाने आजपासून एकही चिनी उत्पादन खरेदी करणार नाही, असा दृढ निश्‍चय करून चीनला धडा शिकवूया. त्यामुळे चीनची आर्थिक नाकेबंदी होईल, असे प्रतिपादन रायगड संवर्धन प्रतिष्ठानच्या सौ. रमा सावंत यांनी केले. रणरागिणी शाखा, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांच्या वतीने २९ जुलैला दादर पश्‍चिम येथील कबुतरखाना येथे आंदोलन करण्यात आले. या वेळी विविध संघटनांचे ६० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक सहभागी झाले होते.

चीनला धडा शिकवून भारतभूमीच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करूया ! – कु. स्वप्नाली जाधव आणि कु. कावेरी मयेकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

पाकिस्तान आणि चीन या शत्रूराष्ट्रांचे सैनिक आणि आतंकवादी यांच्याशी दिवसरात्र प्राणपणाने लढणार्‍या सैनिकांना आपलेच काही नेते बलात्कारी संबोधून त्यांची अवहेलना करतात. त्यामुळे शत्रूराष्ट्राला धडा शिकवण्यासाठी ही नेतेमंडळी काही करतील, अशी अपेक्षा न बाळगता आपण प्रत्येकाने चिनी उत्पादने आणि राख्या यांच्यावर बहिष्कार घातला पाहिजे. चीनला धडा शिकवून भारतभूमीच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करूया.

या वेळी रणरागिणी शाखेच्या सौ. नयना भगत आणि हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गात नियमित येणार्‍या सौ. वैशाली कलमकर यांनीही आंदोलनाला संबोधित केले.