*रिठद येथे प्रजापिता ब्रम्हाकुमारी विद्यालयाचे उदघाटन संपन्न*

0
535
Google search engine
Google search engine
महेंद्र महाजन जैन / रिसोड/वाशिम





           रिसोड-तालुक्यातील रिठद येथे शनिवार दि३ जून ला प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय च्या शाखेचे उदघाटन संपन्न झाले. शाखेचे उदघाटन अकोला केंद्राच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी रुख्मिनी दीदी यांच्या शुभ हस्ते तर राजयोगी ब्रह्माकुमार दिवाकर भाई,राजयोगिनी ब्रह्माकुमारी ज्योती दीदी,ब्राह्मकुमारी गीता दीदी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.रिसोड येथे मागील पंचवीस वर्षा पासून विद्यालयाची शाखा सुरू आहे ब्रह्मा कुमारी ज्योती दीदीनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत केवळ ईश्वरीय सेवेला समर्पित होऊन ज्ञान देण्याचे कार्य सुरूच ठेवले. त्यांच्या सेवा समर्पण व त्यागामुळे आज रिसोड तालुक्यात ईश्वरीय ज्ञान जाणून घडणाऱ्याची संख्या वाढत आहे.त्यामुळे रिठद येथे मागील पाच वर्षांपासून डॉ केशव बोरकर यांच्या निवासस्थानी नियमित ज्ञान वर्ग चालत आहे.नियमित वर्गास येणाऱ्या गावकर्यांनी केंद्र सुरू करण्याची मागणी केली व ज्योती दीदींनी प्रयत्न व पाठपुरावा करून केंद्र सुरू केले.शनिवारी उदघाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना ब्रह्माकुमारी रुख्मिनी दीदींनी ग्रामस्थांनी केंद्र सुरू करण्याचा निर्णयाचे कौतुक केले ईश्वराने सांगितलेल्या मार्गावर पुरुषार्थ करीत राहल्यास स्वकल्याण साधने सहज शक्य होते.दिवाकर भाईंनी मार्गदर्शन करताना केंद्रा च्या सेवेत असणाऱ्या संचालिका ब्राह्मकुमारी गीता दीदी व वर्षा दीदींच्या माध्यमातून जीवन मुक्तीचा राजयोग आणि ज्ञानयोग अपणास अवगत होणार आहे त्यामुळे केंद्राची जबाबदारी ही ग्रामस्थांची आहे.