*महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधि मंडळाने मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे सोबत चर्चा करून निवेदन सादर केले*

0
653
Google search engine
Google search engine

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले/-



०३ जून २०१७ रोजी महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना जिल्हा शाखा अमरावती च्या  प्रतिनिधि मंडळाने  मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध समस्यावर चर्चा केली.जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन माहे एप्रिल २०१७ पासून आजपर्यंत झाले नाही त्यामुळे सर्व शिक्षक आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रतिनिधि मंडळाने शिक्षकांचे वेतन लवकरात लवकर देण्याची मागणी केली. मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी सुध्दा या मागणीची दखल घेऊन त्वरीत वेतन देण्यात यावे असे आदेश संबंधित विभागला दिले व वेतन देण्यात विलंब का झाला याचे कारण सुध्दा संबंधित विभाग ला विचारले.माहे जून २०१७ चे वेतन ईद चा सण असल्यामुळे २६ जून च्या अगोदर व्हावे अशीही मागणी प्रतिनिधि मंडळाने केली त्यावर  मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी ही मागणी स्वीकार करून २६ जून पुर्वी वेतन देण्यात येईल असे आश्वासन दिले. याप्रसंगी त्यांनी उत्सव अग्रिम १०,००० रुपये देण्याची मागणी सुध्दा स्वीकार केली.                            
              मध्यान भोजनची  प्रलंबित माहिती भरण्याची सुविधा केंद्र प्रमुख यांचे लाँगिन च्या ऐवजी मुख्याध्यापक लाँगिन वर उपलब्ध करून देण्याची सुध्दा याप्रसंगी मागणी करण्यात आली यावर तशी सुविधा उपलब्ध करून देण्याबद्दल सकारात्मक आश्वासन दिले.
    उपरोक्त सर्व मुद्दावर नितीनजी गोंडाणे ( अध्यक्ष स्थायी समिती ) जिल्हा परिषद अमरावती यांचे सोबतही  सकारात्मक चर्चा करून प्रतिनिधी मंडळाने निवेदन सादर केले.तसेच शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) डाँ. श्रीराम
पानझाड़े यांचे सोबत चर्चा करून निवेदन देण्यात आले यावर डाँ.श्रीराम पानझाडे यांनीही सकारात्मक चर्चा करीत वरील समस्यावर समाधानकारक अंमलबजावणी करण्याचे आश्वासन प्रतिनिधि मंडराला दिले.याप्रसंगी मो. नाजिम ( विभागीय सचिव ), मो. साजिद ( जिल्हाध्यक्ष ), जावेद इकबाल जौहर ( जिल्हा सचिव ), मुजहिदुल्लाह खान ( जिल्हा कार्याध्यक्ष ), मुजाहिद फराज ( जिल्हा कोषाध्यक्ष ) शाहनवाज हुसैन ( तालुका अध्यक्ष नांदगाव खंडेश्वर) व गुफरान हुसैन तालुकाध्यक्ष अचलपूर ) व इतर प्रतिनिधि मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना ही  राज्यातील एकमात्र शासन मान्यता प्राप्त उर्दू शिक्षक संघटना आहे जी राज्यात प्राथमिक शिक्षण, विद्यार्थि व शिक्षक यांच्या समस्यांना घेउन शासन व प्रशासन यांच्यात समन्वय कायम करून त्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न सतत करित असते.