रिसोड तहसीलवर ऍड नकुलदादा देशमुख यांच्या नेतृत्वात शेतकरी मोर्चा धडकला

0
1099
Google search engine
Google search engine

                    
 महेंद्र महाजन जैन रिसोड/ वाशिम 

वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे शेतकऱ्याच्या  संपास पाठिंबा तर सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी ऍड नकुलदादा देशमुख यांच्या नेतृत्वात    दि 3 जून ला  तहसील कार्यालयावर  हजारोच्या संख्येने शेतकरी मोर्चा धडकला . शेतकर्यानी भाजीपाला व दुध रस्त्यावर फेकून आपला निषेध नोंदविला .माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या लोणी फाट्यावरील जनसंपर्क कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. हजारो शेतकऱयांनी मोर्चात सहभागी होत मुख्य बाजारपेठ,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला .यावेळी ऍड नकुलदादा देशमुख यांच्या नेतृत्वात सातबारा कोरा झालाच पाहिजे,स्वामींनाथन आयोगाच्या शिफारसी त्वरित लागु कराव्यात,शेतीमालास हमी भाव दयावा, शेतकऱयांना 60 वर्षांनंतर पेन्शन योजना लागू करावी,शेतीसाठी अखंडित व मोफत वीजपुरवठा करावा, ठिंबक व तुषार सिंचनासाठी 100 टक्के अनुदान देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले .शेतकऱयांच्या संपास पाठिंबा देत कृषी उत्पन्न बाजार समिती ,बाजारपेठ,दूध दुकान बंद ठेवत कडकडीत बंद पाळला