मराठा क्रांती मोर्चाचे बॅनर लावणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांवर दमदाटी करुन बॅनर लावण्यास पोलिसांची मनाई

0
577
Google search engine
Google search engine

पोलिसांच्या दमदाटीला न घाबरता मराठा क्रांती मोर्चाचे बॅनर लावलेच

शहरात वर्षभर किती अवैध जाहिरात फलक लागतात याकडे सुद्धा पोलिसांनी लक्ष द्यायला हवे 

गेले वर्षभर अक्ख्या महाराष्ट्रातुन वाहणारे मराठा_क्रांती _मुकमोर्चा चे वादळ आता निर्णायक स्तिथीला आले असुन याचा ठोक आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठ्ठा मोर्चा मुंबईत बुधवार दि ९ ऑगस्ट २०१७ रोजी होणार आहे
यानिमित्त मुंबईत जागोजागी मराठा बांधव  मराठा_क्रांती_मोर्चा चे बॅनर लावत आहेत.
असाच एक बॅनर अंधेरी पुर्व मधील मरोळ पाईपलाईन येथे लावण्यात आला. मरोळ मधील तरुण कार्यकर्ते सुरज पवार, देवेंद्र मापेलकर व काही कार्यकर्ते पाईपलाईन येथे बॅनर लावत असताना काही पोलीस तिथे आले आणि बॅनर लावण्यास मनाई केली
परवानगी वगैरेची कारणे सांगुन कार्यकर्त्यांना दमदाटी करु लागले दमदाटी करणारे पोलीस मराठी असुन सुद्धा मराठा मोर्चाच्या बॅनरला विरोध करत होती. पोलिसांच्या दमदाटीला न घाबरता मराठा क्रांती मोर्चाचे बॅनर लावणाऱया सुरज पवार, देवेंद्र मापेलकर आणि त्यांचा टीम चे अभिनंदन होत आहे