उपोषणाला बसलेल्या मेधा ताई पाटकरांना अटक

0
567
Google search engine
Google search engine

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात चिखल्दा गावात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आंदोलन करत पोलिसांनी त्‍यांना अटक केली आहे. गेल्या १२ दिवसांपासून मेधा पाटकर सरदार सरोवरावर बांधण्यात येणाऱ्या धरणाच्या उंचीविरोधात उपोषणाला बसल्या होत्या.
मेधा पाटकर यांच्या उपोषणस्थळी पोलिस पोहोचले आणि त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांशी पोलिसांची बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी मेधा पाटकर यांच्यासोबत १२ कार्यकर्त्यांना अटक केली.