१५ ऑगस्टला सरपंचांनी झेंडावंदन करू नका – पक्षपात विसरून आपण प्रथम शेतकरी पुत्र असल्याची जाण ठेवावी. प्रहार जनशक्ती पक्षातर्फे सरपंचांना आवाहन

0
614
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे (शहेजाद खान )-

भाजप सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत आहे. मुख्यमंत्री सातत्याने कर्जमुक्तीबद्दल वेगवेगळी भुमिका मांडत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. मोदी सरकारने स्वामीनाथन समितीची शिफारस लागू करण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यानतंर त्यांना याचा विसर पडत आहे. राज्य सरकारने आता संपुर्ण कर्जमाफी केली पाहिजे. तालुक्यातील सर्व सरपंचांनी येत्या १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहन करू नये व शेतकऱ्यांसाठी सगळ्यांनी मदत करावी असे आवाहन प्रहार संघटनेचे तालुका प्रमुख सौरभ इंगळे यांच्यासह प्रहार कार्यकर्त्यांनी एका पत्रकातुन केले आहे.

       महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पण अद्याप ती मिळाली नाही. 400 वर्षांपूर्वी मोघल, दीडशे वर्षांपूर्वी ब्रिटीश आणि आता सरकार यांनी लोकांवर फक्त अन्यायच केला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या सरकारचे हात रक्ताने बंबाळले आहेत. तसेच कर्जमाफीसाठी सरकार शेतकऱ्यांकडून अर्ज मागवत आहे. कर्जमाफी ही बँकांनी द्यायची आहे. सरकार स्वतःच्या पदराचे काही देत नसून तो जनतेचाच पैसा आहे. त्यामुळे, दानशूर असल्याचा आव सरकारने आणू नये. शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी न मिळाल्यामुळे तालुक्यातील सर्व सरपंचांनी १५ ऑगस्टला झेंडावंदन करू नये, पक्षपात विसरूण आपण प्रथम एक शेतकरी पुत्र आहोत याची जाण ठेवुन सर्व शेतकऱ्यांसाठी मदत करावी असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख सौरभ इंगळेसह प्रहार कार्यकर्त्यांनी एका पत्रकातुन केले आहे.