*अचलपूर येथील सुवर्णकार सुभाष चेडे यांचा मुलगा प्रीतेशचा ह्लदय विकाराने मृत्यू*

0
1035
Google search engine
Google search engine

अचलपूर / प्रमोद नैकेले /-
शहरातील प्रसीध्द सुवर्णकार सुभाष चेडे यांचा एकुलता एक मुलगा प्रीतेश चेडे याचा ह्रदय विकाराने मृत्यू झाला.
अचलपूर येथील बेगमपूरा निवासी सुभाष चेडे हे शहरातील प्रसिध्दी सोन्याचे व्यापारी आहेत.त्यांचे देवळी सराफा लाईन येथे सोनार व सराफाचे दुकान आहे तसेच त्यांचे लहान बंधू प्रकाश चेडे यांचे सोन्या चांदीच्या आभुषणाचे शोरूम आहे.सुभाष चेडे यांना एक मुलगा व एक मुलगी असून प्रीतेश हा एकूलता एक मुलगा आपल्या ऐन उमेदीच्या वयात घरात अचानक ह्रदय विकाराचा झटका येवून निधन झाले मृत्यू समयी तो केवळ 29 वर्षाचा होता.त्याच्या मृत्यूने चेडे परिवारा सोबत मीत्र मंडळीमध्ये शोककळा पसरली.अचानक झालेल्या मृत्यूमुळे अचलपूर पोलीस स्टेशनने संशयीत मृत्यू म्हणून प्राथमिक नोंद केली व उत्तरीय तपासणी स्थानीक उपजिल्हा रुग्णालयात करून मृतदेह त्याचे वडिलांचे ताब्यात दिला रात्री उशिरा त्याचेवर अंतिम संस्कार करण्यात आले.डॉक्टरांनी ह्रदय विकाराचा तिव्र झटक्याने मृत्यू झाल्याचे उत्तरीय तपासणी मध्ये म्हटले आहे.