राज्यातील शेतकरी आजपासून संपावर जाणार !-

0
588
Google search engine
Google search engine

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – 

शेतमालाला योग्य हमीभाल द्यावे, तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राजव्यापी संपाचा एल्गार पुकारला असून आज पासून शेतकरी संपावर आहेत.

त्यामुळे मुंबई सह अनेक शहरात भाजीपाला, दूध आणि दैनंदिन आवश्यकता वस्तुंचा तुटवडा जाणवणार आहे. शेतमालाला योग्य हमीभाल द्यावे, तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राजव्यापी संपाचा इशारा दिला होता. हा संप मागे घेण्यासाठी कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल अहमदनगरमधील पुणतांबा गावात आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांसोबत भेटीचा प्रस्ताव दिल्यानंतर मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरल्यामुळे शेतकऱ्यांनी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.