*आदिवासी विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाची सोय प्रितेश अवघड यांच्या प्रयत्नाने उपलब्ध*

0
649
Google search engine
Google search engine

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले/-


गेल्या ३ वर्षापासुन मेळघाट मधिल काटकुंभ या अतिदुर्गम भागात प्रितेशजी अवघड यांच्या मार्गदर्शनाखाली संगणक प्रशिक्षण सोय उपलब्ध.
सामाजिक संस्थेचे माध्यमाने गरिब आर्थिक दुर्बल घटकातील  विद्यार्थ्यासाठी निशुल्क कँम्पुटर प्रशिक्षण शिबीर, निःशुल्क टायपिंग प्रशिक्षण शिबीर, वाचनालय , करियर गायडंट्स शिबीर, असे निःशुल्क विद्यार्थी हिताय शिबीर आणि प्रशिक्षण घेण्यात येते, ज्या अभ्यास कमासाठी राहु, बिबा, काटकुंभ, चुर्णी,जारिदा , हतरू, रायपुर, कुकरू-खामला, गंगारखेडा, काेरडा येथिल विद्यार्थांना परतवाडा-अमरावती सारख्या शहरात जावे लागत हाेते परंतु, या संस्थेमुळे आज या भागातले विद्यार्थ्यांना हाेणारा शारिरीक-मानसिक-आर्थिक ञास पुर्णत: संपुष्टात आला. जेव्हा २०१५ जानेवारी ला हि चळवळ सुरू केली तेव्हा फक्त ३-४ विद्यार्थी हाेते,माञ आज दर तिन महिण्याला ७०-८० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्या जाते, त्यात विद्यार्थीनींचा सहभाग माेठा असताे, तिथले वाचनालयात असलेल्या संपूर्ण पुस्तकांचा खजाना प्रितेशभाऊनी दिला असुन,तिथल्या प्रत्येक कार्यक्रमात प्रितेश भाऊ स्वत: हजर असतात, असाच प्रसंग शनिवार ला आला, काटकुंभ च्या आजुबाजूच्या शासकीय आश्रम शाळा व अनुदानित शाळा  येथिल ११वी १२वी वर्गाला ३-४ वर्षापासुन chemistry-physics-match चे शिक्षक उपलब्ध नाहींत त्यामुळे विद्यार्थीना या विषयाबाबत ज्ञान प्राप्त हाेण्यासाठी राजस्थान विश्वविद्यालय येथे कार्यरत असलेले श्री प्रा.बेलकर सर यांच्या मार्गदर्शनाने १५ दिवसीय निःशुल्क शिकवनी वर्ग घेण्यात आला, त्याचा आज निराेप समारंभ हाेता, यावेळी मार्गदर्शक प्रितेशभाऊ अवघड, प्रा.बेलकर सर, यशस्वी काँम्पुटर संस्थेला यशस्वी बनविनारे राकेश झारखंडे, व इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले, तसेच मी सुद्धा पहिल्यादा मार्गदर्शन पर बाेललाे, पण विद्यार्थी ना मार्गदर्शन करतेवेळी मला एक माञ  कळले बाेलणे साेपे आहे, करणे कठिण त्यामुळे प्रितेशभाऊ आणि राकेश यांनी सामाजिक बांधिलकीतुन जाेपासलेल हे राेपट उद्या वटवृक्ष बनुन अनेक विद्यार्थ्यांना सावली देईल व या सामाजिक कार्यात प्रितेश भाऊंचे योगदान महत्वाचे ठर