देवगांव चौफुलीवर प्रहारचा चक्काजाम बच्चु कडुचा शेतकऱ्यांना दिलासा..

0
655
Google search engine
Google search engine

धामणगांव रेल्वे / श्री मंगेश भुजबळ /-

महाराष्ट्र शासनाच्या फसव्या कर्जमाफीच्या निषेधात शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीने पुन्हा एकदा आंदोलनात्मक भूमिका घेतल्याने बच्चु कडु यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील महामार्गांवर चक्का जाम आंदोलन करण्यात आले असतांना बच्चू कडू व प्रहारच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातील देवगाव चोफुलीवर सुद्धा नागपूर-ओरंगाबाद एक्सप्रेस महामार्ग तब्बल तीन तास रोखून धरला होता.
तालुक्यातील देवगांव चौफुलीवर सकाळपासुन प्रहारच्या आंदोलनाचा इशाऱ्याने पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त‍ लागला होता. सकाळी 10 वाजता पासून तालुक्यातील देवगांव चॊरस्त्यावर शेतकरी व कार्यकर्ते गर्दी करून होते. 11 वाजताचे दरम्यान बच्चु कडु व त्याच्या कार्यकर्त्यानी चक्काजाम करित महाराष्ट्र शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या व तत्काळ सरसकट कर्जमाफीची मागणी करण्यात आली. रत्यावर जाळपोळ करुन मोदी सरकारच्या नावावर बोंबा देत प्रहारच्या कार्यकत्यांनी घोषणबाजी केली.

आमदार व प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चु कडु यांनी बोलतांना म्हटले की, जगाचा पोशींदा शेतकरी आहे. शेतकरी हा प्रत्येक गोष्टीचा कर भरतो, शेतात काम करणाऱ्या ट्रक्टर चे डिझेल सुध्दा करयुक्त भरण्यात येते तरी शेतकऱ्यांना कोणत्याही सोई सुविधा नाही मात्र सनदी अधिकाऱ्यांना पगार लाखाच्या घरात त्यांना राहणे फिरणे मोफत तसेच दरवर्षी वेतन आयोग सुरु राहतो. आमच्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला जरी योग्य भाव दिला तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची वेळ येणार नाही.
शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आणखी गरिब होत चालला असुन त्याला कोणीही वाली राहला नाही.आजच्या परीस्थितीत शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी करणे गरजेचे असतांना त्यात काही निकष टाकुन सरकार शेतकऱ्यांची दिशाभुल करित आहे. असा आरोप आमदार बच्चु कडु यांनी फडणविस सरकारवर केला.

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण हेंडवे, उपाध्यक्ष तेजस धुर्वे तालुका प्रमुख अमर ठाकरे, प्रहार शेतकरी संघटना तालुका प्रमुख विशाल सावरकर,शहर अध्यक्ष प्रविण रोहणकार,विघार्थी तालुका प्रमुख राहुल चांभारे,वैभव बावनकुडे,सरफराज खान,आदित्य भुसारी, अक्षय धोपटे, भरत पनपालीया, मंगेश माळोदे, निलेश पाल, मनोज कुंभलकर,मंगेश सोनोने, मुकुंद कोल्हे, संदिप ठावरे, दिनेश निचत, बालु वानखडे, योगेश कावडे,अतुल नागमोते, गोपाल रोंघे, मुना गुप्ता, सचिन झोड, राजेंन्द्र वैघ, मुन्ना पांडे, क्रिष्णा काळे, अवघुत डंबळे, मुकुंद कडु, गणेश कडु,सुरेश जुनघरे,नरेश गांवडे , अतुल टाले, दिपक पारखंडे,शरद तितरे,नरेंद्र खुटे, विनेाद वाघ,तसेच असंख्य प्रहारचे कार्यकर्ते तसेच शेतकरी उपसिथत होते.

 

*आज पालक मंत्र्यांना ध्वजावरोहणास बंदी घालणार*

आज दिवभरात जिल्ह्यातील अनेक ठिकाणी झालेल्या चक्का जाम आंदोलनाच्या नंतर प्रहार संस्थापक बच्चू कडू यांनी दिलेल्या मुलाखतीत प्रत्येकाने शेतकरी कुटुंबात जन्म घेतल्याने ग्रामपंचाय स्तरावर स्वातंत्र्य दिनी निषेध नोंदवण्याचे आव्हान केले

 

*श्री कडू जाताच कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून वाहनात डांबले*

तब्बल 3 तास चाललेल्या या चक्का जाम आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकरी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उभे असलेल्या बच्चू कडूनी पुढच्या जागी निघून जाताच पोलिसांनी सर्वांची धरपकड सुरू केली व काही कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतले होते मात्र नेता जाताच त्यांचा वाली कोणीही नसल्याचे दिसून येत होते