देशातील निधर्मीवादी संघटना आता गप्प का ? – श्री योगी आदित्यनाथ

0
1121
Google search engine
Google search engine

केरळमधील गोहत्येचे प्रकरण

लक्ष्मणपुरी – केरळमध्ये गुरांच्या संदर्भातील कायद्याला विरोध करतांना माकप आणि काँग्रेस यांच्याकडून गोमांस मेजवानी करण्यात आली. त्यावर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीका केली आहे. देशातील निधर्मीवादी संघटना आता गप्प का आहेत, असा प्रश्‍न त्यांनी विचारला आहे. योगी आदित्यनाथ म्हणाले की, सरकारचा एक आदेश लागू झाल्यावर गोमांस मेजवानी देण्यात आली. मला वाटते की, देशात एकमेकांच्या भावनांना सन्मान देण्याची गोष्ट नेहमीच केली जाते आणि यात निधर्मीवादी संघटना नेहमीच पुढे असतात; मात्र केरळमधील घटनेनंतर ते गप्प का आहेत, हे मला अद्याप समजलेले नाही. ते सर्व या सूत्रावर मौन आहेत.