कोल्हापुरी बंधा-याच्या पाट्या टाकण्याकरिता जिल्हाधिका-यांनी निधी केला वर्ग – आमदार डॉ. अनिल बोंडे यांचा पाठपुरावा.

0
412
Google search engine
Google search engine

अमरावती:-

यावर्षी अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. म्हणून मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यात ब-यापैकी पाउस आल्याने नदीनाल्यांना साचलेले पाणी अडविण्याकरिता कोल्हापुरी बंधा-याच्या पाट्या टाकण्यासाठी आमदार डॉ.अनील बोंडे यांनी जिल्हाधिकारी व मंत्रालयात सातत्याने मागणी केली. परिणामी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी माहिती दिली कि, मंगळवार दिनांक ३ ऑक्टोबर २०१७ रोजी निधी वर्ग केल्या जाणार असून कोल्हापुरी बंधा-याचे पाट्या टाकण्याचे काम युद्धस्तरावर केल्या जाणार आहे. तसेच जिल्हा परिषद व लघु पाटबंधारे विभाग यांनी तातडीने पाट्या टाकण्याचे काम पूर्णत्वास नेवून पाणी अडवायचे आहे.
अमरावती जिल्हातील सर्व कोल्हापुरी बंधा-याचे पाट्या टाकून फोटोग्राफ्सद्वारे घेऊन नोंद करण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहे. सर्व नागरिकांनी, ग्राम पंचायतीने कोल्हापुरी बंधा-याची निगा राखणे व पाट्या टाकण्याच्या कामास सहकार्य करणे अपेक्षित आहे. पाणी अडविण्याचे काम न झाल्यास आमदार डॉ. अनिल बोंडे यांच्या ९४२२१५६३३६ या क्रमांकावर संदेश (मेसेज) करून किंवा व्हाट्सएप ९९२३७१६३३६ या क्रमांकावर फोटो, व्यक्तीचे नाव, गावाचे नाव, बंधा-याचे नाव मेसेजमध्ये टाकण्यात यावे. कोल्हापुरी बंधा-याच्या पाट्या टाकण्याबाबत संपूर्ण पाठपुरावा करण्यात येईल असे आवाहन आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी केले.