विजेच्या च्या बिलावर चक्क घरचा माणसाचा फोटो …..कार्यकारी अभियंता करणार का एजन्सी वर कार्यवाही

0
973
Google search engine
Google search engine

*बादल डकरे / मोर्शी*-

 

मोर्शी तालुक्यातील मीटर वाचनाचा करार हा मागील 2 महिण्याआधी बदलला होता.ठेकेदार यांनी जुन्या मीटर वाचक याना कमी करून त्या ठिकाणी नवीन मीटर वाचक याना आणून मोर्शी तालुक्यातील मीटर वाचन मागील सप्टेंबर महिन्यामध्ये केले होते.या सर्व घटने दरम्यान जुन्या मीटर वाचक याचे महावीतरण कार्यलाय समोर ठेकेदार यांच्या मनमानी पणा विरोधात उपोषण सुरू होते.मात्र आमदार अनिल बोंडे यांच्या मध्यस्तीने उपोषण सोडण्यात आले.आणि कार्यकारी अभियंता याना विचारले असता नवीन मीटर वाचक यांच्या कडून चुकी झाल्यास त्यावर कार्यवाही कोण करणार असे विचारले असता ,त्यांच्या वर योग्य ती कठोर कार्यवाही करणार असल्याचे अभियंता यांनी सांगितले होते.मात्र आता नेमकी कार्यवाही एजन्सी वर होणार की मीटर वाचक यांच्यावर पाहावे लागेल.
आपल्या कामात पारदर्शकता यावी म्हणून चुकीचा फोटो टाकून रिडींग घेतल्याचे सदरहू बिलावरून दिसून येत आहे.मात्र अभियंता कार्यवाही करणार की नाही हे पाहवेच लागेल.