​चांदूर रेल्वे तालुक्यात ३५९ अर्ज वैध ठरले १७ सरपंचपदासाठी ६५ तर ८७ सदस्यांसाठी २९४ अर्ज

0
444
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वेः – (शहेजाद खान) 

चांदूर रेल्वे तालुक्यातील १७ ग्रा.पं.च्या निवडणूकीच्या नामनिर्देशनपत्राची छाननी काल पार पडली. या प्रक्रियेमध्ये केवळ निंभा ग्रा.पं.सदस्यासाठीचा एक अर्ज बाद झाला असुन १७ सरपंचपदासाठी ६५ व ८७ सदस्यांसाठी २९४ नामनिर्देशनपत्रे असे एकुण ३५९ अर्ज वैध ठरले आहे. निंभा ग्रा.पं.सरपंचपदासाठी ३ अर्ज तर ग्रा.पं.सदस्यासाठी १५ अर्ज आले होते. त्यापैकी ग्रा.पं.सदस्यासाठीचा एक अर्ज अवैध झाला असून इतर १४ अर्ज वैध ठरले आहे. सोनगाव ग्रा.पं.सरपंच पदाकरीता ४ अर्ज व ग्रा.पं.सदस्यासाठी २९ अर्ज, राजना ग्रा.पं.सरपंचपदासाठी ३, तर ग्रा.पं.सदस्यासाठी १४ अर्ज वैध ठरले. दहिगाव धावडे ग्रा.पं.सरपंचपदासाठी ३, तर ग्रा.पं.सदस्याकरीता १५ अर्ज, कळमगाव ग्रा.पं. सरपंचपदासाठी ५, तर ग्रा.पं.सदस्याकरीता १४ अर्ज, कोहळा ग्रा.पं.सरपंचपदासाठी ६, तर ग्रा.पं.सदस्याकरीता ८ अर्ज, धोत्रा ग्रा.पं.सरपंचपदासाठी ४, तर ग्रा.पं.सदस्याकरीता १० अर्ज, भिलटेक ग्रा.पं.सरपंचपदासाठी २, तर ग्रा.पं. सदस्यासाठी १३ अर्ज, कवठा कडू ग्रा.पं.सरपंचपदासाठी ४, तर ग्रा.पं.सदस्याकरीता २७ अर्ज, टेंभूर्णी ग्रा.पं. सरपंचपदासाठी ४, तर ग्रा.पं.सदस्याकरीता १८ अर्ज, मांजरखेड कसबा ग्रा.पं.सरपंचपदासाठी ७, तर ग्रा.पं. सदस्याकरीता ३४ अर्ज, सावंगी संगम ग्रा.पं. सरपंचपदासाठी २, तर ग्रा.पं.सदस्याकरीता १४ अर्ज, मांडवा ग्रा.पं. सरपंचपदासाठी ६,तर ग्रा.पं.सदस्यासाठी १८ अर्ज, टोंगलाबाद ग्रा.पं.सरपंचपदासाठी ३, तर ग्रा.पं.सदस्यासाठी १९ अर्ज, दिघी कोल्हे ग्रा.पं.सरपंचपदासाठी ३, तर ग्रा.पं.सदस्याकरीता १५ अर्ज, कळमजापूर ग्रा.पं.सरपंचपदासाठी २, तर ग्रा.पं.सदस्याकरीता १६ अर्ज, बागापुर ग्रा.पं.सरपंचपदासाठी ४, तर ग्रा.पं.सदस्याकरीता १६ अर्ज वैध ठरले आहे. ५ ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्याच दिवशी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. प्रत्यक्ष मतदान १६ ऑक्टोबरला सकाळी ७.३० ते ५.३० या कालावधीत होणार आहे.