मालेगाव येथे हागणदारी मुक्ती निर्धार सभा

0
843
Google search engine
Google search engine
महेन्द्र महाजन जैन / रिसोड –


मालेगांव :- वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील बालाजी मंगलकार्यालयात  पाणी स्वच्छता मिशन जिल्हा परिषद वाशिम  वतीने तालुका हागणदारी मुक्ती निर्धार सभा मुख्यकार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि 25 मे ला पार पडली
वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुका हागणदारी मुक्ती कडे वाटचाल करत असून काही अडचणी येत असल्याने मालेगाव येथील बालाजी मंगल कार्यालयात मुख्य कार्यकारिकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या आदेशाने तालुका 15 आगस्ट पर्यंत हागणदारीमुक्त करण्यासाठी कोल्हापूर येथील टीम ला आमंत्रित करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्यकार्यकारी अधिकारी गणेश पाटील ,उपमुख्यकार्यकारी अधिकारी विनायक साने,गट विकास अधिकारी थोरात,सभापती मंगलाताई गवई,उपसभापती ज्ञानबा सावले , कोल्हापूर येथील टीम ची उपस्थिती लाभली यावेळी तालुक्यातील हागणदरी मुक्त झालेल्या 20 ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांचा सत्कार करण्यात आला जनतेला मुख्यकार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या हस्ते शौचालय अनुदान अर्जाचे वाटप करण्यात असले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू सरतापे यांनी करून आभार मानले कार्यक्रमासला तालुक्यातील विविध विभागातील अधिकारी कर्मचार्यासह  सरपंस ,ग्रामसेवक,व्हिलेज चॅम्पियन आणि शेकडो गावकाऱयांची उपस्थिती लाभली
महादेव हरणे मालेगांव